Devendra Fadnavis | BJP
Devendra Fadnavis | BJP  Sarkarnama
देश

देवेंद्र फडणविसांनी मंत्रिपदासाठी जाहिर केलेल्या भाजप नेत्याचा मोठा पराभव

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात भाजपने आज मोठा विजय संपादन केला आहे. ४० जागांपैकी तब्बल २० जागा जिंकत बहुमताच्या जवळ पोहचण्यात भाजपने यश मिळवलं आहे. यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, बाबूश मोन्सेरात अशा दिग्गजांचा विजय झाला आहे. मात्र राजेश पाटणेकर यांच्यासारख्या गोव्यातील भाजपच्या जेष्ठ्य नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या विरोधात डिचोलीमधून डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी ४०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे गोव्यात एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पहिल्या मंत्र्यांचा देखील पराभव झाला आहे.

गोवा विधानसभेचा प्रचार सुरु असताना गोवा भाजपचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील पहिल्या मंत्र्यांचे नाव जाहिर केले होते. ते म्हणाले होते, आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परवा बोलताना सांगितले, तुम्ही पाटणेकरांना सभापती म्हणून पाठवा. पण मी सांगतो, ते परत जेव्हा येतील तेव्हा मंत्र्यांच्या गाडीतून बसूनच येतील. त्यामुळे तुमचं आता चांगलं आहे, एका बाजूला मुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला मंत्री. म्हणजे एका तालुक्यात तुम्ही काय-काय करणार आहात हे लक्षात येत नाही, पण चांगले आहे. खरोखरचं पाटणेकर एक चांगला माणूस आहे, त्यामुळे मुख्यमंत्री जे म्हणाले ते खरंच आहे.

राजेश पाटणेकर हे सुरुवातील निवडणूक लढवण्यास इच्छूक नव्हते. तसे त्यांनी पक्ष श्रेष्ठींना कळवले देखील होते. मात्र पक्षांने त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार केले होते. यावर देखील फडणविसांनी भाष्य केले होते. ते म्हणाले, राजेश पाटणेकर सुरुवातीला विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांची मनधरणी यशस्वी झाल्याने ते आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर कोणीच टिकणार नाही. आता पाटणेकरच निवडून येणार. गोव्यातील सर्वसामान्यांशी जोडलेला, down-to-earth अशा प्रकारचा नेता म्हणून पाटणेकरांची प्रतिमा आहे. त्यांच्याकडे एक प्रदीर्घ अनुभव आहे, असे म्हणत फडणवीसांनी पाटणेकरांचे कौतुकही केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT