New Delhi : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बुधवारी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यांतून अनुक्रमे चार व एक उमेदवार असेल. केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरूगन आणि अश्विनी वैष्णव यांनाही राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. (Rajya Sabha Election 2024)
मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) मुरूगन यांच्यासह उमेश नाथ महाराज, माया नरोलिया आणि बन्सीलाल गुर्जर यांना तर ओडिशातून वैष्णव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी भाजपने (BJP) राजस्थानमधील उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तर रविवारी बिहार, छत्तीसगड, हरयाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील 14 उमेदवारंची घोषणा करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील उमेदवार कोण?
महाराष्ट्रात (Maharashtra) राज्यसभेच्या सहा जागा असून अद्याप एकाही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. सहापैकी चार जागा सहजपणे भाजपच्या पारड्यात पडू शकतात. तर एक जागा शिवसेना शिंदे गटाला आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळू शकते. एका जागेसाठी काँग्रेसने चंद्रकांत हंडोरेंना आज उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून पाचव्या जागेसाठी चाचपणी सुरू असल्याचे समजते. असे झाल्यास हंडोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोनिया गांधींनी भरला अर्ज
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आज राजस्थानातून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला. मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. तेलंगणासह मध्य प्रदेश व राजस्थानमधून त्या निवडणुकीत उतरू शकतात, अशी चर्चा होती. तेलंगणा काँग्रेसने सोनियांनी इथून उमेदवार व्हावे, असा ठरावही केला होता. पण अखेर त्यांनी राजस्थानवर शिक्कामोर्तब केले आहे.
राज्यसभेच्या देशभरातील 15 राज्यांतील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी आहे. त्यामुळे आज आणि उद्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.