BJP's strategic move for Rajya Sabha: (Left) Maharashtra Minister Chandrashekhar Bawankule appointed as observer for Odisha sarkarnama
देश

Rajya Sabha Election : महाराष्ट्राच्या मंत्र्याकडे ओडिशाची जबाबदारी : भाजपच्या उमेदवारांसाठी लावावी लागणार मतांची फिल्डिंग

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या २६ जागा बिनविरोध झाल्या असून, महाराष्ट्रातील ७ उमेदवारांचा त्यात समावेश आहे. आता बिहार, हरियाणा आणि ओडिसातील ११ जागांसाठी १६ मार्चला मतदान होईल, ज्याची धुरा बावनकुळे आणि सांघवींकडे आहे.

Hrishikesh Nalagune

Rajya sabha Election 2026 : देशभरात राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सोमवारी (9 मार्च) यातील 26 जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचाही समावेश आहे. मात्र, 3 राज्यातील 11 जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान होणार आहे.

बिहार, हरियाणा आणि ओडिशा या 3 राज्यांमध्ये 11 जागांवर ही निवडणूक होत आहे. यात भाजपसह काँग्रेसचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्याचवेळी ओडिशा राज्यातील निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.

भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी 3 राज्यातील निवडणुकीसाठी पर्यवेक्षकांची घोषणा केली. यात बिहारची जबाबदारी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि केंद्रीय राज्य मंत्री हर्ष मल्होत्रा यांच्याकडे दिली आहे. हरियाणासाठी गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी आणि ओडिशासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची पर्यवक्षेक म्हणून नियुक्ती झाली आहे.

ओडिशामध्ये 4 जागांसाठी 5 उमेदवार मैदानात आहेत. भाजपने 2 उमेदवार रिंगणात उतरविले असून एका उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय बीजेडीने 1 आणि काँगेसने 1 उमेदवाराला समर्थन दिले आहे. यात भाजपचे 2 आणि बीजेडीच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तर चौथ्या जागेसाठी भाजप समर्थित दिलीप रे आणि काँग्रेस समर्थित दत्तेश्वर मिक्ष यांच्या लढत होणार आहे.

कोण-कोण बिनविरोध?

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शरद पवार यांच्यासह रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते, रामदास वडकुते, ज्योती वाघमारे आणि पार्थ पवार बिनविरोधत निवडून आले आहेत. तर तेलंगणातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी पुन्हा राज्यसभेत दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे बंगालमधून 5, तमिळनाडूमधील 6, छत्तीसगडमधील 2, आसाममधील 3, हिमाचल प्रदेशतील 1 आणि तेलंगणातील 2 राज्यसभा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT