Rajya Sabha Election: देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश असून यामध्ये शरद पवार, रामदास आठवले आणि अन्य नेत्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात या खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. पण यामुळं देशभरातील कोणकोणते फायर ब्रँड खासदार पुन्हा सभागृहात परतणार का? अशी चचा सुरु झाली आहे. यामध्ये कुठल्या खासदारांचा समावेश आहे जाणून घेऊयात. १६ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.
नोटिफिकेशन - गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख - गुरुवार, ५ मार्च २०२६
अर्जांची पडताळणीची तारीख - शुक्रवार, ६ मार्च २०२६
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - ९ मार्च २०२६
मतदानाची तारीख - सोमवार, १६ मार्च २०२६
मतदानाची वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत
मतमोजणीची तारीख - सोमवार, १६ मार्च २०२६ (संध्याकाळी ५ वाजता)
निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, २० मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक
देशभरातील ३७ जागांसाठी ही राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र (७), ओडिशा (४), तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), आसाम (३), बिहार (५), छत्तीसगढ (२), हरयाणा (२), हिमाचल प्रदेश (१) आणि तेलंगाणा (२) या जागांचा समावेश आहे.
2 एप्रिल २०२६ रोजी कार्यकाळ संपणारे खासदार
महाराष्ट्र -
शरद पवार, डॉ. भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धर्यशील पाटील, रजनी पाटील, रामदास आठवले या महाराष्ट्रातील खासदार निवृत्त होत आहेत.
ओडिशा -
ममता मोहंता, मुझिबुल्ला खान, सुजित कुमार, निरंजन बिशी
तामिळनाडू -
एन. आर. इलांगो, पी. सेल्वरासू, एम. थंबिदुराई, तिरुची सिवा, डॉ. कनिमोझी एनव्हीएन. सोमू, जी. के. वसन,
पश्चिम बंगाल -
साकेत गोखले, रितब्रता बॅनर्जी, बिकास रंजन भट्टाचार्य, मौसम नूर (५.१.२०२६ पासून रिक्त), सुब्रता बक्षी
९ एप्रिल २०२६ कार्यकाळ संपणारे खासदार
आसाम -
रामेश्वत तेली, भुबनेश्वर कलिता, अजितकुमार भुयान
बिहार -
अमरेंदर धरी सिंग, प्रेमचंद गुप्ता, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह, हरिबंश नारायण सिंघ
छत्तीसगड -
कवी तेजपाल सिंह तुलसी, फुलो देवी नेतम
हरयाणा -
किरण चौधरी, राम चंदेर जंग्रा
हिमाचल प्रदेश -
इंदू बाला गोस्वामी
तेलंगणा -
डॉ. अभिषेक मनु सिंघवी, के. आर. सुरेश रेड्डी
शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, साकेत गोखले, अभिषेक मनु संघवी हे सातत्यानं प्रश्न विचारणारे फायर ब्रँड खासदार पुन्हा राज्यसभा लढवून सभागृहात येणार का? हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.