Rajya Sabha Election, Congress Sarkarnama
देश

Rajya Sabha Elections : काँग्रेसचे 5 राज्यसभा उमेदवार बिनविरोध विजयी! भाजपसोबत काटे की टक्कर...

Congres Mallikarjun Kharge Pawan Khera : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला पाच जागांवर बिनविरोध विजय मिळवता आला आहे. मल्लिकार्जून खर्ग हे राज्यसभेचे बिनविरोध सदस्य झाले आहेत.

Roshan More

Congres News : राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होईल, अशी चर्चा होती. भाजपची तब्बल 15 राज्यांमध्ये सत्ता आहे. तर, एनडीएमधील मित्रपक्षांसोबत ते 22 राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यामुळे ही राज्यसभा निवडणूक भाजपसाठी सोपी ठरली आहे. 10 ते 12 राज्यांमध्ये ही निवडणूक होत आहे.

18 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी 26 जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपचे 12 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले आहेत. तर, दक्षिणेतील राज्यांमध्ये कर्नाटक आणि तेलंगणामध्ये असलेल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसच पाच उमेदवार देखील बिनविरोध विजयी झाले आहेत.

कर्नाटकमधून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, पवन खेरा तर, राजस्थानमधून नीरज डांगे, तमिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती हे बिनविरोध निवडून गेले आहेत. तर, राज्यसभेतील 26 जागांपैकी 23 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे.

एनडीएमध्ये भाजपचे 12, तर, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसेना यांचा प्रत्येक एक उमेदवार तर, टीडीपीचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचा झटका

मध्यप्रदेशमधून काँग्रेसने मीनाक्षी नटराजन यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. तेलंगणामध्ये दाखल असलेला गुन्हा लपवल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. दरम्यान, त्यांनी या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज त्यावर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने नटराजन यांची याचिका फेटाळत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

झारखंडमध्ये निवडणूक

राज्यसभेची निवडणूक 18 जूनला होणार आहे. या निवडणुकीत आता झारखंडमधील दोन आणि मिझोराममधील एका जागेसाठी मतदान होणार आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची सत्ता आहे. त्यामुळे त्या दोन जागांवर काय होणार याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT