Abhishek Singhvi Sarkarnama
देश

Abhishek Singhvi Net Worth : संसदेत सिंघवींच्या बाकाखाली सापडले नोटांचे बंडल; राज्यसभेत गोंधळ अन् चौकशीचा आदेश...पाहा VIDEO

Abhishek Manu Singhvi Controversy Cash Found in Parliament : राज्यसभा सभागृहातील सापडलेल्या नोटांच्या बंडलावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळात अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची चौकशीचा आदेश दिला.

Pradeep Pendhare

Rajya Sabha News : संसदेत सत्ताधारी भाजप आणि विरोधक काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळतो आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्यांवरून गदारोळ होतच आहे. यात आणखी एका नव्या वादाची भर फडली. सभागृहातील आसन क्रमांक 222 इथून नोटांचे बंडल जप्त केल्याची माहिती राज्यसभा अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली.

ही जागा तेलंगणा राज्यातून निवडून आलेले अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. ही बाब माझ्या निदर्शनास आणून देतात सभागृहाता गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांना आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. जगदीप धनखड यांनी यावर या सर्व प्रकाराची सखोल चौकशी सुरू असून, तसे आदेश दिल्याचे जाहीर केले.

राज्यसभा (Rajya Sabha) अध्यक्ष तथा उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड यांनी हा मुद्दा सभागृहासमोर आणताच, गदारोळ झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी राज्यसभा अध्यक्षांनी सदस्याचे अशा प्रकारात नाव घेऊ नये अशी मागणी केली. त्यावर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यावर आक्षेप असण्याचे कारण नाही.

सभापतींनी फक्त आसन क्रमांक आणि त्या विशिष्ट आसन क्रमांकावर बसलेल्या सदस्याचे योग्य नाव सांगितले आहे. यात चूक काहीच नाही आणि विरोधकांनी आक्षेप देखील घेऊ नये, असे सांगितले. तसेच नियमित नियमित प्रोटोकॉलनुसार सुरक्षा यंत्रणेने तपासादरम्यान नोटा जप्त केल्या असून ते आसन क्रमांक डिक्रिप्ट करण्यात आल्याची माहिती किरण रिजिजू यांनी दिली.

भाजप (BJP) नेते तथा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना नोटांचे बंडल सभागृहात घेऊन जाणे योग्य आहे का? आम्ही सभागृहात नोटांचे बंडल घेऊन जात नाही. याची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी आणि सदस्यांनी मांडलेल्या चिंताही अगदी वास्तविक आहेत. अध्यक्षांनी या प्रकरणाशी निगडीत केलेल्या टिप्पणीशी मी पूर्णपणे सहमत आहे, असेही सांगितले.

काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील या प्रकारावर आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "हे ऐकून मला धक्का बसला आहे. असे कधीच ऐकले नाही, ते मी ऐकत आहे. मी काल दुपारी १२.५७ वाजता सभागृहात पोचलो.

दुपारी एक वाजता सभागृह उठले. दुपारी 1 ते 1:30 पर्यंत मी आणि अयोध्याप्रसाद यांनी कॅन्टीनमध्ये बसून जेवण केले. मी दुपारी दीड वाजता संसदेतून बाहेर पडलो. त्यामुळे काल मी एकूण 3 मिनिटे सभागृहात आणि 30 मिनिटे कॅन्टीनमध्ये राहिलो".

अशा प्रकाराचे राजकरण करणे हे गंभीर आणि विचित्र आहे. अर्थात लोक काहीही, कुठेही आणि कोणत्याही आसान क्रमांकावर काहीही करू शकतात, आणि याचा तपास व्हायला हवा. याशिवाय प्रत्येकाची एक आसानक्रमांक फिक्स असावे आणि ते आसान लॉक करता येईल आणि चावी खासदाराकडे नेता येईल.

कारण मग प्रत्येकजण आसानावर काहीही करू शकतो. त्यावरून आरोप होऊ शकतात. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. तसेच सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटी देखील समोर आल्या आहे. त्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT