MP Anil Bonde Sarkarnama
देश

Anil Bonde news : राज्यसभेत अनिल बोंडेंचा प्रतिहल्ला, काँग्रेसची घोषणाबाजी काँग्रेसवरच उलटवली; सत्ताधारी खासदारांनीही दणक्यात दिली साथ

Rajya Sabha, BJP MP, Congress, Parliament uproar : राज्यसभेत विरोधकांच्या घोषणाबाजीला अनिल बोंडेंचा आक्रमक प्रतिहल्ला; ‘काँग्रेस के दफ्तर में’ घोषणांनी सत्ताधारी बाकांवरूनही जोरदार साथ.

Rajanand More

Rajya Sabha news : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे तिसऱ्या दिवशीही अनेकदा विस्कळीत झाले. राज्यसभेत काहीकाळ कामकाज होऊ शकले. विरोधकांकडून सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून संसदेत दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे तर राम मंदिरातील दानचोरीवरून सरकारला घेरले जात आहे.

काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांतील खासदारांकडून संसदेत आणि संसदेबाहेरही 'चंदाचोर कहां मिलेंगे, भाजपा के दफ्तर में' अशा घोषणा देत भाजपवर निशाणा साधला जात आहे. विरोधक माघार घेण्यास तयार नसल्याने केंद्र सरकार बॅकफूटवर गेले आहे. मात्र, गुरूवारी भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या घोषणेवरूनही जोरदार पलटवार केला. त्याला भाजपच्या इतर खासदारांची साथ मिळाली.

अर्थ खात्याकडून सादर करण्यात आलेल्या एका विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना बोंडे थेट काँग्रेसवर घसरले. त्यांनी सरकारच्या कामाचे कौतुक करतानाच २०१४ पूर्वीच्या स्थितीचा उल्लेख केला. '2014 से पहले बच्चा-बच्चा ये बोल सकता था कि कोयला चोर, भ्रष्टाचारी और आतंकवादी कहां मिलेंगे?', असे बोंडे यांनी म्हणताच सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही लगेच 'काँग्रेस के दफ्तर में', अशी घोषणाबाजी केली.

बोंडे इथेच थांबले नाहीत. देशद्रोही कहां मिलेंगे, सैन्य विरोधी कहां मिलेंगे, किसान विरोधी कहां मिलेंगे, असा एक-एक प्रश्न बोंडे उपस्थित करत असताना त्यांच्या पाठोपाठ सत्ताधारी खासदारही 'काँग्रेस के दफ्तर में' अशा घोषणा देत होते. सभागृहात यावरून गोंधळ होऊ नये, यासाठी उपसभापती हरिवंश यांनी त्यावर आक्षेप घेत त्यांना मुळ मुद्द्यावर बोलण्यास सांगत होते. मात्र, बोंडे यांनी सर्व घोषणा पूर्ण करतच आपले भाषण थांबिवले.

दरम्यान, खासदार बोंडे यांच्या या वादग्रस्त घोषणांवर काँग्रेसकडूनही पलटवार करण्यात आला आहे. बोंडे यांना उद्देशून काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद म्हणाले, खासदार जे बोलले ते खरे असेल तर २०१४ नंतर काँग्रेसच्या कार्यालयातून किती दहशतवादी अटक केले? आमच्या कार्यालयात बसलेल्या किती दहशतवाद्यांची ओळख पटविली? अटक झाली नसेल तर तुमचे सरकार बिनकामाचे आहे. त्यांची ही विधाने केवळ मुळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी असल्याची टीका मसूद यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT