Ram Mandir Donation Theft NEWS Sarkarnama
देश

Ram Mandir Donation Theft: राम मंदिर देणगी चोरीत धक्कादायक खुलासा! चोरीचे पैसे शेअर मार्केटमध्ये, 30 बँक खाती गोठवली

Ayodhya Ram Mandir, Donation Theft: राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणात पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली आहेत. चोरीची रक्कम शेअर बाजार, व्याज व्यवहार, सोने आणि मालमत्ता खरेदीसाठी वापरल्याचा धक्कादायक तपास समोर आला आहे.

Mangesh Mahale

Ayodhya News:अयोध्या : राम मंदिरातील भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीवरच डल्ला मारणाऱ्या आरोपींचे धक्कादायक कारनामे तपासात उघड होत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस सध्या बँक स्टेटमेंट, डिजिटल व्यवहार आणि आर्थिक पुरावे तपासत आहेत. राम मंदिरातून नेमकी किती रक्कम चोरीला गेली आणि हा संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार किती मोठ्या नेटवर्कद्वारे चालवला गेला याचा सखोल तपास सुरू आहे. तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

चोरी केलेली रक्कम आरोपींनी केवळ लंपासच केली नाही, तर ती शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात आली, व्याजाने लोकांना कर्जरूपाने वाटण्यात आली आणि सोनं, रोख रक्कम तसेच मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांनी आरोपींच्या घरांवर छापेमारी सुरू आहे. अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा आणि करुणेश पांडेय यांच्या घराची पोलिस झाडाझडती घेत आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू, वाहन आणि जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जप्त केलेल्या रोख रकमेचा अधिकृत आकडा मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

देणगीचा पैसा शेअर मार्केटमध्ये; व्याज व्यवहारात गुतंवले

तपासादरम्यान आरोपींनी चोरीतील काही रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याची कबुली दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय ही रक्कम लोकांना व्याजाने देऊन त्यातून नफा कमावण्याचाही प्रकार समोर आला आहे. म्हणजेच, भाविकांच्या श्रद्धेचा पैसा आर्थिक व्यवहारासाठी वापरल्याचे गंभीर आरोप तपासात पुढे आले आहेत.

30 बँक खाती गोठवली; नातेवाईकांच्या खात्यांचा वापर

पोलिस तपासात आरोपींनी चोरीची रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न ठेवता नातेवाईकांच्या बँक खात्यांमध्ये वळवली. त्यानंतर ती पुन्हा स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण व्यवहारात वापरण्यात आलेली 30 बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. या खात्यांमधील व्यवहार संबंधित खातेदारांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा खूपच जास्त असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.

जमीन खरेदीचाही तपास

तपासा दरम्यान पोलिसांना अनुकल्प मिश्रा यांच्या नावावर खरेदी केलेल्या एक एकर जमिनीची कागदपत्रे ही मिळाली आहेत. ही जमीन सुमारे 6.7 लाख रुपयांना खरेदी करण्यात आल्याची नोंद असून, सध्याच्या बाजारभावानुसार तिची किंमत अनेकपटीने अधिक असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींच्या ताब्यातील एका वाहनाचाही तपास सुरू असून ते त्यांच्या वडिलांच्या नावावर नोंद असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT