दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे यशस्वी राजकारण्यासोबच एक इंग्लिश भाषेचे विद्वान देखील मानले जातात. मात्र चक्क त्यांच्याच इंग्लिशमधील चुका आणि स्पेलिंग मिस्टेक दाखवण्याचे काम केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी केले आहे. या शिकवणुकीची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरु आहे.
नेमकं काय झालं?
काल शशि थरुर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणावर टीका करत एक ट्विट केले. या ट्विटमधून टीका करताना थरुर यांनी लोकसभेत सीतारमन यांचे भाषण सुरु असताना रामदास आठवले यांच्या चेहऱ्यांवरील आश्चर्यचकित हावभावांचा एक फोटो वापरला आणि त्यावर इंग्लिशमध्ये मजकूर लिहिला.
मात्र हा मजकूर लिहिताना त्यांचे रिप्लाय आणि बजेट या दोन शब्दांचे स्पेलिंग चुकले. यावरच बोट ठेवत आठवले यांनी त्यांना तत्थहिन दावे आणि वक्तव्य करताना अनेक चुका म्हणत थरुर यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. यात “Bydget” नाही तर BUDGET आणि rely नाही तर “reply” असते.
यावर पुन्हा थरुर यांनी रामदास आठवले यांनी दाखवून दिलेल्या चुकांचे स्वागत करत बरोबर करण्याबाबत काळजी घेण्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी तिथे कोणतरी जेएनयुमधील उपस्थित आहे, असे म्हणत पुन्हा एकदा सीतारमन यांच्यावर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.