Ramdas Athawale in Rajya Sabha Sarkarnama
देश

Ramdas Athawale : आठवलेंनी पुढच्या टर्मचे मंत्रिपद केले फिक्स! खर्गे, नड्डांना टाळी वाजवायला लावली...

Waqf Bill Debate in Rajya Sabha : राज्यसभेत यावेळी अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यांनाही रामदास आठवलेंच्या या कविता ऐकून हसू आवरले नाही.

Rajanand More

Rajya Sabha session : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी मध्यरात्री वक्फ विधेयकावर चर्चेदरम्यान आपल्या मंत्रिपदावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीतील कवितांमधून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही ‘तुम भी बजाओ ताली’ असे म्हणत कोटी केली. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही हसू आवरले नाही. 

रामदास आठवलेंनी कवितेनेच आपल्या भाषणाला सुरवात केली. इतनी हो गई है रात, मै कर रहां हू वक्फ बील पर बात, मै दे रहा हूं मोदीजी को साथ, इसलिए काँग्रेस को मैं दिखा रहा हूं हात..., असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर पहिला निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी नेहमीच मुस्लिम, गरीब, दलित, अल्पसंख्यांकांवर बोलतात. हे बिल सर्व मुस्लिमांना न्याय देणारे आहे. हे असंविधानिक नाही. मुस्लिमांवर आजपर्यंत अन्याय होत राहिला. काँग्रेसने फोडा आणि राज्य करा, असे काम करत राहिली. मुस्लिम, दलितांना न्याय मिळत नव्हता, अशी टीका आठवलेंनी केली.

सभागृहामध्ये यावेळी अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यांनाही आठवलेंच्या या कविता ऐकून हसू आवरले नाही. पुढच्या कवितेत आठवले म्हणतात, नरेंद्र मोदी है मुसलमानों के सच्चे वाली, खर्गेसाहब बजाओ जोरदार ताली, मत देदो मोदीसाहब को गाली, नहीं तो खुर्सी करो खाली, विरोधी दलों की रात हो रही है काली, नड्डासाहब बजाओ तुम भी ताली, अशी टोलेबाजी त्यांनी केली.

खर्गेसाहेब, तुम्हाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बनविण्याची संधी होती, पण काँग्रेसने बनवले नाही. मलाही मंत्री करण्याची संधी होती, पण तुम्ही बनवले नाही, म्हणून मी इकडे आलो. मोदींनी सत्तेत आल्यानंतर मोठे परिवर्तन करण्याचे काम केले. तुम्ही मुस्लिमांची मते लोकसभेत घेतली. पण आता मुस्लिमांची मतेही आमच्याकडे येत असल्याचे आठवले म्हणाले.

वक्फ बिल पारित झाल्यानंतर सर्व मुस्लिमांची मते आमच्याकडे येतील. तुमच्याकडे कुणीच राहणार नाही. सर्व समाज आमच्याकडे येतील. हे बिल पारित झाल्यानंतर नरेंद्र मोदीजी चौथ्यांदा पंतप्रधान बनतील. त्यानंतर मीही मंत्री होईन, असे सांगत आठवलेंनी पुढच्या टर्ममध्ये मंत्रिपदावर दावा ठोकला. माझा पक्ष छोटा असला तरी पुढे मोठा होईल. मी एकटाच खासदार आहे. माझा पक्ष या बिलाचे समर्थन करत असल्याचे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT