Ramdas Athawale offer to Adhir Ranjan Chaudhary Sarkarnama
देश

Ramdas Athawale News : रामदास आठवलेंनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींना दिली 'ही' खुली ऑफर!

Mayur Ratnaparkhe

Ramdas Athawale on Congress News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना खुली ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटले की, पश्चिम बंगालमधून पराभूत झाल्यामुळे त्यांना दुर्लक्षित आणि अपमानित केलं जात आहे. काँग्रेसच्या या वागणुकीमुळे अनेकजण पक्ष सोडून भाजपमध्ये सहभागी झाले आहेत.

'मी अधीर रंजन चौधरी यांना विनंती करतो की जर काँग्रेसमध्ये त्यांचा अपमान होत असेल, तर त्यांनी काँग्रेस सोडली पाहिजे. तसेच, रामदास आठवले यांनी पुढे म्हटले की, मी एनडीए किंवा माझा पक्ष आरपीआय मध्ये प्रवेश करण्यासाठी अधीर रंजन चौधरी यांना आमंत्रित करतो आहे.' असं रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे.

या आधी 30 जुलै रोजी अधीर रंजन चौधरी(Adhir Ranjan Chaudhary) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधला होता. प्राप्त माहितीनुसार अधीर रंजन चौधरी यांनी असे म्हटले आहे की, ज्या दिवशी मल्लिकार्जुन खर्गे पक्षाचे अध्यक्ष बनले, त्या दिवसापासून पक्षाच्या घटनेनुसार, देशात पक्षाची बाकी सर्व पद अस्थायी झाली आहेत. एवढच काय तर माझं पदही अस्थायी झालं आहे.

याशिवाय अधीर रंजन चौधरी म्हणाले की, जेव्हा लोकसभा निवडणूक सुरू होती. तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी टेलिव्हिजनवर सांगितले होते की जर गरज पडली तर मला बाहेर ठेवलं जाईल. खरंतर मी निवडणुकीदरम्यान पक्ष नेत्यांसमोर माझं मत मांडलं होतं, परंतु खर्गेंच्या अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं. तुम्ही बघितलं असेल की पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी चांगला राहिला नाही. भलेही मी अस्थायी प्रदेशाध्यक्ष होतो, परंतु राज्यात मिळालेल्या पराभवामुळे माझी जबाबदारी होती की यासाठी मी स्वत:ला उत्तरदायी मानावं. यानंतर मी खर्गे यांना म्हणालो होतो की जर शक्य असेल तर तुम्ही माझी जागा अन्य कोणाला देवू शकता.

यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी पुढे सांगितले की, या दरम्यान मला AICCने पश्चिम बंगालच्या काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्यास सांगितलं गेलं. म्हणाले की दोन आवश्यक प्रस्ताव पारीत केले जाणार आहेत. ही बैठक माझ्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. बैठकीपर्यंत मी पश्चिम बंगाल काँग्रेसचा अध्यक्ष होतो, मात्र बैठकीदरम्यान गुलाम अली मीर यांनी मला संबोधित करताना माजी प्रदेशाध्यक्ष म्हटलं. तेव्हा मला समजलं की मी आता प्रदेशाध्यक्ष राहिलेलो नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT