Ramdeb Baba
Ramdeb Baba Sarkarnama
देश

Ramdev Baba : पेट्रोलनंतर रामदेव बाबांची नवी भविष्यवाणी; म्हणाले "पाकिस्तानचे..."

सरकारनामा ब्युरोे

Ramdev Baba : योगगुरू रामदेव बाबा यांनी पेट्रोल ३५ रुपये लिटर मिळणार, असा दावा २०१४ पूर्वी केला होता. त्यानंतर आता त्यांनी पाकिस्तानबाबत दुसरी भविष्यवाणी केली आहे. भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त योगगुरू रामदेव (Ramdev baba) हरिद्वारमधील पतंजली योगपीठात (Patanjali) नागरिकांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानबाबत भाष्य केले आहे.

योगगुरू रामदेव म्हणाले की, "जागतिक राजकारणात (International Politics) खूप मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सध्या युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे. आपल्या भारत देशाविरोधात संधी मिळेल तेव्हा चीन (Chin) व पाककडून कुरापती केल्या जातात. आफगाणीस्तान सांभळताना तालिबान्यांच्या नाकीनऊ येत आहेत. यासह पाकिस्तानमध्येही सध्या विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. महागाईमुळे तेथे आराजकता माजली आहे."

पाकिस्तान (Pakistan) देशाबाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, "पाकिस्तानमधील सध्यस्थितीमुळे पाकचे लवकरच चार तुकडे होणार आहेत. त्यातील बलूचिस्तान (Baluchistan) स्वतंत्र देश होईल. तर पाकव्याप्त काश्मीर (Pak occupide Kashmir) आणि पंजाब (Pak occupied Panjab) भारतात विलीन होईल. त्यामुळे अखंड भारताचे स्वप्न साकार होणार आहे. त्यातून येणाऱ्या काळात भारत एक महाशक्ती म्हणून नावारूपास येण्यास वेळ लागणार नाही."

सनातन (Sanatan) धर्मावरील हल्ला सहन करणार नसल्याचा इशाराही यावेळी रामदेव बाबांनी दिला आहे. याबाबत ते म्हणाले, "रामायण, भगवद्गीता, वेद व उपनिषदांना कलंकित करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहेत. सनातन धर्माच्या बदनामीसाठी देशात धार्मिक दहशतवाद सुरू आहे. त्यात कधी सनातन धर्म, तर कधी आपल्या महापुरुषांचे चारित्र्य हनन केले जात आहे. त्याचे कारस्थान आंतरराष्ट्रीय पातळीवरून केले जात असून ते सहन करणार नाही", असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

SCROLL FOR NEXT