Reserve Bank Sarkarnama
देश

Repo Rate News : ट्रम्प यांच्या दणक्यानंतर रिझर्व्ह बँकेचं मोठं पाऊल; सर्वसामान्यांवरील कर्जाचा बोजा होणार कमी

RBI Repo Rate Cut 2025 Home Loan EMI Reduction : रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटच्या दरात 25 बेसिस पॉइंट्स एवढी कपात केली आहे. त्यामुळे हा दर आता 6 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

Rajanand More

Mumbai News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर व्यापार कर लादला आहे. भारतावरील हा कर म्हणजेच टेरिफ तब्बल 26 टक्के असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. 9) सुरू झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटच्या दरात 25 बेसिस पॉइंट्स एवढी कपात केली आहे. त्यामुळे हा दर आता 6 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 2025 मध्ये बँकेने दुसऱ्यांदा ही कपात केली आहे. बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय परिणाम होणार?

बँकेने रेपो दर कमी केल्याने पुढील काही दिवसांत गृह, वैयक्तिक, वाहन, आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते कमी होऊन एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. किरकोळ महागाई दरही 4 टक्के राहण्याची शक्यता चलनविषयक धोरण समितीने व्यक्त केली आहे.

आरबीआयकडून कमी व्याजता बँकांना कर्ज मिळाले तर संबंधित बँकांकडूनही ग्राहकां कर्ज देताना कमी व्याज दर दिला जाईल. रेपो रेट कमी झाल्याने बँकांवरील ताणही कमी होतो. रेपो रेट वाढला तर हा आर्थिक ताण वाढतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात करणे, इतर बँकांसह ग्राहकांसाठीही फायद्याचे ठरते.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरातील कपातीची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात चिंताजनक झाली असून जगात व्यापारातील संघर्ष प्रकर्षाने समोर आला आहे. यापार्श्वभूमीवर समितीने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले. प्रामुख्याने देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्यास आरबीआयकडे रेपो दर कमी केले जातात. असे केल्याने गुंतवणूक वाढते, आर्थिक विकासाला गती मिळू शकतो, असे मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT