Reserve Bank of India Sarkarnama
देश

RBI new regulations : बँक खातेदारांसाठी महत्वाची बातमी; खात्यातून पैशांची चोरी झाल्यास मिळणार मोठी भरपाई, RBI ची घोषणा

Bank fraud compensation rules : सध्या आरबीआयच्या २०१७ च्या दिशानिर्देशांनुसार बेकायदेशीर व्यवहारांमध्ये ग्राहकांचे दायित्व कमी असते. नव्या फ्रेमवर्कमध्ये ते आता अधिक मजबूत केले जाणार आहे.

Rajanand More

RBI customer protection : मागील काही वर्षांत देशात ऑनलाईन बँक व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यासोबतच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. बँक खात्यांमधून पैशांची चोरी झाल्याच्या घटना दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक खातेदारांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीच्या फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये ग्राहकांच्या खात्यांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे. प्रामुख्याने डिजिटल बँक व्यवहारांवर विशेष लक्ष असणार आहे. बँक खात्यातून होणारी पैशांची चोरी म्हणजेच फॉड व्यवहारांशी संबंधित नवा आराखडा तयार केला जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, आरबीआयकडून लवकरच एक अशी व्यवस्था आणली जाणार आहे, ज्यामध्ये फ्रॉड व्यवहारातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून ग्राहकांना २५ हजार रुपये दिले जातील. सायबर चोरीची शिकार झालेल्या खातेदारांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या आरबीआयच्या २०१७ च्या दिशानिर्देशांनुसार बेकायदेशीर व्यवहारांमध्ये ग्राहकांचे दायित्व कमी असते. नव्या फ्रेमवर्कमध्ये ते आता अधिक मजबूत केले जाणार आहे. व्यवहारामध्ये फ्रॉड झाल्याचे आढलून आल्यास आणि ग्राहकाने वेळेत याबाबत तक्रार केल्यानंतर बँकेकडून संबंधित ग्राहकाला भरपाई दिली जाईल. हा नियम प्रामुख्याने यूपीआय, कार्ड व्यवहार आणि ऑनलाईन व्यवहारांवर लागू असेल. त्याचा लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत यांनी देशातील आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत झाल्याचेही स्पष्ट केले. सध्याच्या ५.२५ टक्के या रेपो रेटध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची घोषणाही त्यांनी केली. दुसरीकडे बँकेने जीडीपी ७.४ टक्के राहील, असा अंदाज वर्तविला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना उपाययोजना

बँक व्यवहारांमध्ये सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची शक्यता अधिक असते. त्याअनुषंगाने रिझर्व्ह बँकेने ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यांच्या व्यवहारांच्या रकमेवर बंधने आणणे, अतिरिक्त ऑथेंटिकेशन आदी बाबींचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी एक आराखडा तयार केला जाईल. त्यावर खातेदारांच्या अभिप्राय घेतले जातील. फ्रॉड होऊ नये, यासाठी या उपाययोजना केल्या जाणार आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT