India digital census 2027 Sarkarnama
देश

India digital census 2027 : देशामधील जनगणना, डिजिटल होणार; 34 लाख कर्मचारी अशी पूर्ण करणार कार्यवाही

Registrar General of India 34 Lakh Employees to Launch Digital Census Next Year : भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी नियुक्त केलेल्या या पर्यवेक्षक अन् कर्मचारी हे जनगणनेचे सर्व काम अँड्रॉइड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनवरून करतील.

Pradeep Pendhare

India census 2027 employees : पुढील वर्षी सुरू होणारी जनगणना ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार आहे. यासाठी तब्बल 34 लाख जनगणना कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी स्मार्टफोनच्या माध्यमातून माहिती संकलनाचे काम करतील.

भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी नियुक्त केलेल्या या पर्यवेक्षक अन् कर्मचारी हे जनगणनेचे सर्व काम अँड्रॉइड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनवरून करतील. विशेष अ‍ॅपच्या मदतीने संकलित माहिती थेट केंद्रीय (Central Government) संकेतस्थळावर हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे, जनगणना अधिक वेगवान, अचूक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जनगणना करणारे सर्व कर्मचारी या प्रक्रियेत मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करणार आहेत. हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर 2021 च्या जनगणनेच्या कामासाठी विकसित करण्यात आले होते. हे अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोन्सला सपोर्ट करणारे असणार आहेत.

विशेष बाब म्हणजे, हे अ‍ॅप्स इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चार वर्षे जुन्या या अ‍ॅप्लिकेशनमध्ये आता अनेक तांत्रिक सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे कोणताही जनगणना कर्मचारी (Government Employees) ते सहज आणि सोप्या पद्धतीने ऑपरेट करू शकेल आणि त्यात जनगणनेसाठी डेटा अपलोड करू शकेल.

2011 मध्ये झालेल्या सामाजिक-आर्थिक जातीच्या जनगणने दरम्यान, जनगणना कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कागद न हाताळता काम केले होते. पण त्यावेळी जनगणना कर्मचाऱ्यांना टॅब्लेट देण्यात आले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना हे टॅब्लेट देण्यात आले होते.

पण यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून 2027च्या जनगणनेत प्रथमच, सर्व निवासी आणि अनिवासी इमारती जिओ-टॅग केल्या जातील. याशिवाय अहवालानुसार, जर काही कारणास्तव जनगणना कर्मचारी कागदावर कोणताही डेटा गोळा करत असेल, तर त्याला तो एका समर्पित वेब पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे.

जनगणनेच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पातळीवर सर्व प्रकारच्या जनगणनेचा डेटा डिजिटल करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यामुळे, जनगणनेची सर्व माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT