Satej Patil Latest News, Congress Party latest news, Political News Sarkarnama
देश

सतेज पाटलांसाठी तरूण पोहचला थेट राहुल गांधींच्या घरी! नेत्यांकडे केली मोठी मागणी

ऋतिक घागरे या तरूणाने दिल्लीत घेतली वरिष्ठ नेत्यांची भेट...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच एका तरूणाने थेट दिल्ली गाठत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या घरी तसेच इतर वरिष्ठ नेत्यांना पत्र देत त्याने माजी मंत्री सतेज पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केली आहे. (Satej Patil Latest Marathi News)

विधीचे शिक्षण घेणारा ऋृतिक घागरे हा पाटील यांच्यासाठी दिल्लीत पोहचला आहे. त्यानेच ट्विटवरून ही माहिती देत नेत्यांना भेटल्याचा दावा केला आहे. मंगळवारी राहुल गांधी यांचे निवासस्थान व काँग्रेस मुख्यालयात गेल्याचे त्याने म्हटले आहे. मुख्यालयाबाहेरील फोटोही त्याने ट्विट केला आहे.

'आज नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी 12 तुगलक लेन येथे पत्र देऊन तर AICC चे महासचिव व संघटन प्रभारी के. सी वेणुगोपाल यांना AICC office मध्ये प्रत्यक्ष भेटून काँग्रेसचा वैचारिक कार्यकर्ता म्हणून सतेज पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेस चे अध्यक्ष करावे अशी विनंती केली,' असं घागरे याने ट्विटमध्ये म्हटले आहे.(Congress Party latest news)

सतेज पाटील यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले. त्याची व्यवस्थितपणे उत्तरं दिली. माझी पार्श्वभूमी, शिक्षण व दिल्लीत कसा आलास याबद्दलही वेणुगोपाल यांनी विचारपूस केल्याचा दावा घागरे याने केला आहे. वेणुगोपाल यांना दिलेले पत्रही घागरे याने ट्विट केले आहे.

पत्रामध्ये सतेज पाटील यांनी जिंकलेल्या निवडणुकांची माहितीही देण्यात आली आहे. पाटील हे उत्कृष्ट संघटक आणि नेते असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी घागरे याने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT