Hardik Pandya, Rajiv Shukla sarkarnama
देश

रियाझ भाटीच्या पत्नीचे क्रिकेटपट्टू हार्दीक पांड्यावर गंभीर आरोप

मला हार्दिकसोबत हॉटेलमध्ये जाण्यास भाग पाडले गेले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : दाऊद इब्राहिमचा कथित सहकारी रियाझ भाटीच्या (Riaz Bhati) पत्नीने भारतीय क्रिकेपट्टू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याच्या दोन मित्रांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार तिने मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की क्रिकेपट्टू हार्दिक पांड्या आणि त्याच्या दोन मित्रांनी दारुच्या नशेत अनैसर्गिक लैंगिक कृत्य केले. मला हार्दिकसोबत हॉटेलमध्ये जाण्यास भाग पाडले गेले, असा आरोपही भाटीच्या पत्नीने केला आहे. सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या या तक्रारीत माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल, बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि पृथ्वीराज कोठारी यांचीही नावे असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिस तक्रारीत भाटीच्या पत्नीने म्हटले आहे की घटस्फोटानंतर भाटीने मला उच्चभ्रू लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. तिने 24 सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली होती. मात्र, अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. दुसरीकडे, महिलेच्या तक्रारीत विशेष तपशील नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तक्रारीत बलात्काराचे ठिकाण किंवा तारखेचा उल्लेख नाही. तरीही या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत.

गुन्ह्याची पुष्टी नाही...

या संदर्भात मी अनेकवेळा पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांनीही अर्ज आल्याचे कबूल केले आहे. रियाझ भाटीला मुंबई विमानतळावर दोन पासपोर्टसह पकडले गेल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही केला होता. भाटी याच्यावर कथित खंडणी, बनावट कागदपत्रे आणि जमीन बळकावण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीच्या एफआयआरमध्येही त्याचे नाव नोंदवण्यात आले आहे. भाटी याच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या सांगण्यावरून बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT