Lalu Prasad Yadav  Sarkarnama
देश

Lalu Prasad Yadav Poster : ‘टायगर अभी जिंदा है…’ म्हणत लालूंच्या फोटोसह RJDने झळकावले पोस्टर; पाहा आणखी काय आहे?

Lalu Prasad Yadav News : EDकडून लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.

Mayur Ratnaparkhe

RJD Politics News : बिहारमध्ये आगामी निवडणुकीआधी पोस्टर वॉर सुरू झाल्याचे दिसत आहे. राजकारणात पोस्टर, बॅनर वॉर आता सर्रास सुरू झाल्याचे दिसून येतात. आपल्या विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष, नेते पोस्टर्स झळकवताना दिसतात. आता बिहारमध्येही असाच प्रकार समोर आला आहे, ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव(Lalu Prasad Yadav) यांच्या पाटणा येथील निवास्थानाबाहेर एक पोस्टर लावले गेले आहे. ज्यावर - ‘न झुका हूं, न झुकूंगा, टाइगर अभी जिंदा है’ असा मजकूर आहे आणि लालू प्रसाद यादव यांचा फोटो देखील आहे.

खरंतर मागील काही दिवसांपासून लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची EDकडून चौकशी केली जात आहे. तर या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष राजदकडून असं प्रत्युत्तर दिलं गेल्याचं बोललं जात आहे.

EDच्या पाटणामधील कार्यालयात RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी चौकशीसाठी बोलावले होते. यादरम्यान अधिकाऱ्यांनी लालू यादव यांची जवळपास चार तास चौकशी केली. प्रश्न विचारण्यास सुरुवात करण्याधी अधिकाऱ्यांकडून लालू प्रसाद यादव यांची विचारपूस केली गेली होती.

या आधी EDने तेजप्रताप यादव आणि राबडी देवी यांची चौकशी केली होती. २००४ ते २००९ मधील हा प्रकार आहे. लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वेमंत्री होते. त्यांनी आपला पदाचा गैरउपयोग करुन १२ जणांना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी दिली होती. यातील सात जणांना जमीनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचे चौकशीत आढळले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT