Tejashwi Yadav
Tejashwi Yadav  Sarkarnama
देश

भाजपसह चार पक्षांची आघाडी विरोधात उतरूनही तेजस्वी यादवांनी मारलं मैदान!

सरकारनामा ब्युरो

मुझफ्फरनगर : बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. बिहारमध्ये (Bihar) भाजप आणि सहकारी पक्षांची आघाडी विरोधात उतरूनही असूनही राष्ट्रीय जनता दलाने (RJD) बोचहां मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. आरजेडीचे अमरकुमार पासवान हे विजय झाले असून, त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 36 हजार मतांनी विजय मिळवला आहे. यावर विजयाचे श्रेय आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी जनतेला दिले आहे (By-Election News Updates)

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या पोटनिवडणुकीसाठी जोर लावला होता. आरजेडीचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या निवडणुकीत उमेदवार देऊन तेजस्वींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या अडथळ्यांवर तेजस्वी यादव यांनी आपला उमेदवार विजयी केली आहे. या विजयाचे श्रेय त्यांनी जनतेला दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बोचहां मतदारसंघातील जनता जनार्दनाचे धन्यवाद. विधानसभा पोटनिवडणुकीत बेरोजगारी, महागाई यामुळे त्रस्त जनतेने सरकारला जागा दाखवून दिली आहे. डबल इंजिन सरकार व संधीसाधू एनडीएमध्ये सहभागी चार पक्षांच्या जनताविरोधी धोरणांचा जनतेनेच पराभव केला आहे.

दिवंगत आमदार मुसाफिर पासवान यांचे पुत्र अमरकुमार यांना तिकीट देण्याची खेळी आरजेडीने खेळली होती. त्यांना 82 हजार 562 मते मिळाली. याचवेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी मंत्री रमाई राम यांच्या कन्या गीता कुमारी यांना तिकीट दिले होते. त्यांना 45 हजार 909 मते मिळाली. पासवान यांनी कुमार यांचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे. सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनला दलाला आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

विकासशील इन्सान पार्टीचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या मृत्यूमुळे बोचहां मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बेबी कुमारी यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात आरजेडीने अमरकुमार पासवान यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत 59.20 टक्के मतदान झाले होते. एकूण 2 लाख 90 हजार 544 मतदारांनी मतदान केले होते. या पोटनिवणुकीत तीन महिलांसह 13 उमेदवार रिंगणात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT