Sunil Kumar Singh Sarkarnama
देश

Nitish Kumar : विधिमंडळात मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणं भोवलं; आमदारकी रद्द...

Sunil Kumar Singh JDU RJD Assembly Session : लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्यातील राजकीय वैर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Rajanand More

Patna : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलामध्ये तणाव वाढत चालला आहे. लालूंचे अत्यंत विश्वासू नेते आणि विधान परिषदेचे आमदार सुनील कुमार सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

विधान परिषदेत सिंह यांनी नितीश कुमार यांची मिमिक्री करत वादग्रस्त विधान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विधान परिषदेचे सभापती अवदेश नारायण सिंह यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द् केल्याची घोषणा केली. विधान परिषदेच्या आचारसंहिती समितीने सिंह यांच्याविरोधात असंसदीय वागणुकीबाबतचा अहवाल दिला होता.

बिहारचे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 13 फेब्रुवारीला सुनिल सिंह यांनी नितीश कुमारांची मिमिक्री केली होती. तसेच त्यांच्याविषयी काही अपशब्दही वापरल्याचा आरोप जेडीयूने केला होता. त्यावर आचारसंहिता समितीने त्यांनी दोषी धरले. समितीने त्यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती.

दरम्यान, सुनिल कुमार यांनी ही कारवाई म्हणजे सभागृहाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. असे आधी कधीच झालेले नाही. हा अहवाल अनेक षडयंत्र रचणाऱ्यांनी तयार केला असल्याच आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे हा मुद्दा विधिमंडळात चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.   

सुनिल सिंह हे लालू प्रसाद यादव यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. माजी मुख्यमंत्री राबडी देवी त्यांना आपल्या भाऊ मानतात. त्यामुळे सिंह यांची आमदारकी घालवून नितीश कुमार यांनी थेट लालूंना आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. त्यामुळे आरजेडीकडून याविरोधात काय भूमिका घेतली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT