Manoj Jha Sarkarnama
देश

Manoj Jha Vs Modi : उद्या हे 'रामायणासही भाजपचा...' मनोज झा यांचा मोदींवर निशाणा!

RJD vs BJP : '... सूर्य पूर्वेला उगवला, ही मोदींची कृपा' असं म्हणत भाजपलाही लगावला टोला.

Mayur Ratnaparkhe

RJD MP Manoj Jha News : राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत भाजपला टोला लगावला आहे.

मनोज झा म्हणाले, 'असं मानतो की, विमानतळ, रेल्वेस्टेशन, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना आवश्यक आहेच. पंरतु जर एकदा पंतप्रधान मोदी (Modi) प्रभू रामाशी एकांतात बोलले, तर तेव्हा मर्यादापुरुषोत्तमही त्यांना विचारतील, की आमच्या मुलांच्या रोजगाराबाबत काय विचार करताय? देशातील महागाईबद्दल काय विचार करताय पंतप्रधानसाहेब? हे मर्यादापुरुषोत्तम म्हणतील, जर त्यांची संकल्पना तुमच्या मनात योग्य आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय 'ते मोदींना हेही विचारतील, की उत्पन्नाची एवढी मोठी असमानता असूनही तुम्ही एवढं निवांत कसं काय आहात? हे प्रश्न मर्यादापुरुषोत्तम मोदींना विचारतील. जर मर्यादापुरुषोत्तम यांची संकल्पना पंतप्रधान मोदींच्या मनातही तीच आहे, जी बापूंची होती. भाजप (BJP) तर कोणत्याही गोष्टीचा राजकीय मुद्दा बनवू शकते,' असंही मनोज झा यांनी म्हटलं.

याचबरोबर 'मी असं समजतो, की तो दिवसही दूर नाही, की पंतप्रधान किंवा त्यांच्या पक्षांचे लोक म्हणतील की सूर्य पूर्वेला उगवला आहे, ही मोदींची कृपा आहे. म्हणा मोदी, मोदी... काहीही होऊ शकतं. जगातील एकमेव देश आहे, की जिथे लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो आहे.'

तसेच 'पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदींचे फोटो आहेत. जिकडे पाहाल, तिकडे मोदींचे फोटो आहेत. कुठंही गेलात तरी अगदी शौचालय ते विश्वविद्यालय तुम्हाला पंतप्रधान मोदींचेच फोटो पाहायला मिळतील. रेल्वे व्यवस्थित चालत नाही, परंतु रेल्वेत सेल्फी पॉईंट बनवले आहेत. मी तर या गोष्टीमुळे हैराण आहे, की उद्या यांनी रामचरितमानस किंवा रामायणासही भाजपचा ग्रंथ म्हणण्याचा प्रयत्न करू नये,' असंही मनोज झा यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT