west bengal road accident sarkarnama
देश

मृतदेह घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात ; स्मशानभूमीजवळच १८ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील (west bengal) बगदा भागातील हे रहिवाशी आहेत. मृतदेह नेणाऱ्या गाडीचा ट्रकसोबत झालेल्या (road accident) अपघातात १८ जणांना मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (west bengal) रविवारची पहाट उगवली ती वाईट बातमी घेऊनच. रविवार हा अपघाताचा दिवस ठरला, रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या वाहनावर दुसरे वाहन धडकल्यानं यात अठरा जणांना आपले प्राण गमवावे लागले.

पश्चिम बंगालमधील (west bengal) उत्तर 24 परगणा येथील बगदा भागातील हे रहिवाशी आहेत. मृतदेह नेणाऱ्या गाडीचा ट्रकसोबत झालेल्या (road accident) अपघातात १८ जणांना मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी आहेत.

पश्चिम बंगालच्या नादीया जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. मृतदेह घेऊन जाणारे वाहन स्मशानभूमीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे चालकाला ट्रक दिसला नसावा आणि तो वेगात जाऊन ट्रकला धडकला असावा, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांनी दिली.

अपघातानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी मदतकार्य करुन हे मृतदेह बाहेर काढले. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील बगदा भागातून काही जण मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात होते. या वाहनात 20 हून अधिक प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

मृतदेह नेणारी गाडी हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे आली असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर ही गाडी आदळली. या अपघातात गाडीतील १८ जणांना मृत्यू झाला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाला, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. ते पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT