robert vadra, Rahul Gandhi
robert vadra, Rahul Gandhi sarkarnama
देश

ईडी चौकशी : मेव्हण्याच्या समर्थनासाठी भावुक पोस्ट, म्हणाले, 'माझी १५ वेळा चौकशी झाली'

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) ईडीनं (ED) समन्स बजावल्यानंतर आज काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी दिल्लीत ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीकडून राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) चौकशी सुरू आहे.

ईडीच्या चौकशीवरुन राबर्ट वाड्रा (robert vadra) यांनी भावुक पोस्ट केली आहे. (National Herald Case news) "राहुल गांधी यांच्यावरील सर्व आरोप हे निराधार आहेत. या आरोपातून ते मुक्त होतील," असे त्यांनी म्हटलं आहे. ईडीच्या चौकशीबाबत वाड्रा यांनी आपला अनुभव राहुल गांधींना सांगितला आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे पती राबर्ट वाड्रा आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात, "ईडीनं माझी आतापर्यंत १५ वेळा चौकशी केली होती, राहुल, तुमची या सर्व आरोपातून निदोष मुक्तता होईल. ईडीनं माझी १५ वेळा चौकशी केली, त्यांना मी २३ हजार पानांचे दस्ताऐवज दिले आहेत. केंद्र सरकारच्या अशा प्रकारचा दबावाला जनता बळी पडणार नाही. सत्याचा विजय होईल, अशा कारवाईने आम्ही मजबूत होईल. प्रत्येक दिवशी आम्ही सत्याने लढा देऊ, देशातील जनता आमच्यासोबत आहेत,"

ईडी कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी काँग्रेसनं (Congress) दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. दिल्ल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi Vadra) दिल्लीतील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाले होते. रणदीप सुरजेवाला, दिग्विजय सिंह, अधिरंजन चौधरी हे सर्व नेते राहुल गांधींसह ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT