Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : हाजिर हो! ईडीचं न ऐकणाऱ्या केजरीवालांना कोर्टाचा दणका

Rajanand More

New Delhi : कथित मद्य घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनेकदा समन्स पाठवली. चौकशीसाठी त्यांना हजर होण्याची विनंती ईडीकडून केली जात होती. पण केजरीवालांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे ईडीने थेट दिल्लीतील कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने केजरीवालांना दणका दिला आहे. (Arvind Kejriwal News)

दिल्लीतील कोर्टाने केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. त्यांना 17 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. केजरीवाल यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कायद्याचे पालन करणे अपेक्षित आहे. तेच जर कायद्याचे उल्लंघन करत असतील सर्व सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे ईडीने (ED) याचिकेत म्हटले आहे.

अनेकदा समन्स बजावूनही केजरीवाल चौकशीही उपस्थित राहिले नाहीत. ते कोणतेही कारण देत चौकशीला हजर राहण्याचे टाळत आहेत. त्यामुळे हे जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसते, असे ईडीने न्यायालयात सांगितले. केजरीवाल यांना आतापर्यंत ईडीने पाच समन्स पाठवले आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी चौकशीला जाणे टाळले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आम आदमी पक्षाकडून (AAP) ईडीने पाठवलेल्या समन्सवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात होता. ईडीकडून राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन बेकायदेशीरपणे समन्स पाठवल्या जात असल्याचा आरोप आपकडून केला जात आहे. निवडणुकीत प्रचारापासून रोखण्याच्या उद्देशाने हे होत असल्याचा आरोप केजरीवालांनीही केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT