RSS  Sarkarnama
देश

RSS Worker Arrested: मुस्लिम महिलेच्या व्यंगचित्रानं कर्नाटक पेटलं; RSS कार्यकर्त्याला अटक

Cartoon Post on Muslim Women : 'मुले जन्माला घालणारी फॅक्टरी'

सरकारनामा ब्यूरो

Karnataka RSS Worker Cartoon Post On Muslim Women : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याने एका मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र समाज माध्यमांवर शेअर केल्याने सध्या कर्नाटकातील राजकारण तापलं आहे. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर संबधीत कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

रायचूर जिल्ह्यात हा प्रकार नुकताच घडला. येथे एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याने एका मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केलं. त्याखाली त्याने 'मुले जन्माला घालणारी फॅक्टरी'असा उल्लेख केला होता.

यावरुन कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेकांनी यावर तीव्र आक्षेप घेत, संबधीतावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

त्याने हे व्यंगचित्र त्यांच्या व्हॅाटसअॅपवर स्टेटसवर शेअर केले होते. त्यानंतर मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी उमटली आहे, अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात आंदोलन केल्यानंतर रायचूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजू थुंबक याला अटक केली आहे. ते लिंगासुगुर येथील रहिवाशी आहेत. थुबंकने हे स्टेटस् ठेवल्यानंतर मुस्लिम समाजात संताप व्यक्त करण्यात आला.

त्याच्याविरोधात रायचूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा राजू थुंबक याला अटक करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT