Russia Ukraine Crisis latest news 
देश

रशिया युक्रेन संघर्ष चिघळला: राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) संघर्ष टोकाला गेला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) संघर्ष टोकाला गेला असून रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात रशियाने युक्रेनची दोन राज्ये डोनेट्स्क आणि लुहान्स्क ताब्यात घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दोन राज्यांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. रशिया युक्रेनमध्ये आणखी आक्रमण करण्याचा विचार करत आहे. रशियाचा हा निर्णय म्हणजे युक्रेनच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला असून आता रशियाकडून होणाऱ्या कोणत्याही चकमकीचे युद्धात रूपांतर करू शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. (Russia Ukraine Crisis)

रशिया युक्रेन शीतयुद्ध

क्रिमिया ताब्यात घेतल्याने रशिया आणि युक्रेनमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. तेव्हापासून अनेकवेळा रशियाकडून हल्ला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. परंतु प्रत्येक वेळी तो टळला गेला. गेल्या शुक्रवारपर्यंत ज्या युद्धाची पूर्णपणे भीती वाटत होती, ते मुत्सद्देगिरीने सोडवल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय जगतात होत होती. पण आता आपले सैन्य मागे घेणारा रशिया पुन्हा आपल्या तोफा घेऊन सीमेवर पोहोचला आहे.

रशियाची मोठी घोषणा

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल रात्री उशिरा राष्ट्राला संबोधित करताना मोठी घोषणा केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. रशियाच्या युक्रेनवर आक्रमणामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेनमधील परिस्थितीवरून जगभरात तणाव असताना दुसरीकडे सोशल मीडियावर यूजर्सकडून याची मात्र थट्टा केली जात आहे.

अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा बैठक

दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेने मंगळवारी मॉस्कोवर नवीन निर्बंध लादणार असल्याचे जाहीर केले आहे. रशियाचे आजचे निर्णय पाहता उद्या राजधानी मॉस्कोवर नवीन निर्बंध लागू करण्याची करण्यात येतील.याबाबत आम्ही आमच्या सहकार्‍यांशी चर्चा करत आहोत. अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याकडून मिळाली आहे. तर रशियाने युक्रेनच्या दोन प्रांतावर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनने केल्या मागणीवर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता न्यूयॉर्कमध्ये ही बैठक सुरू झाली. सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून भारतही या बैठकीत उपस्थित आहे. रशिया सध्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आहे. अमेरिकेच्या विनंतीनंतर रशियानेही ही बैठकीत खुल्या चर्चेला मान्याता दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT