Russia-Ukraine war
Russia-Ukraine war 
देश

Russia-Ukraine war: युद्धातही माणूसकी जिवंत; व्हिडीओ व्हायरल

अनुराधा धावडे

किव्ह : युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यामुळे रशियाच्या (Russia) जागतिक पातळीवर रशियाची कोंडी सुरू आहे. रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आल्याचा परिणाम रशियाने युक्रेनविरुद्द पुकारलेल्या युद्धावर आहे. रशियन सैनिकांना खाण्यापिण्यासाठी काही नसल्याचे समोर येत आहे. रशियन सैनिकांना पुरेसा अन्नपुरवठा होत नाही. यातच इंधनाचा पुरवठाही अपुरा आहे. यामुळे सैनिकांचे मनोबल कमी झाले आहे. (Russia-Ukraine war news)

मात्र, या युद्धातही माणूसकी जिवंत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सोशल मिडीयावर एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. युक्रेनवर हल्ल्यादरम्यान एक रशियन सैनिक युक्रेनियन नागरिकांना जाळ्यात अडकला. त्याचवेळी त्याने शरणागतीही पत्करली. पण युक्रेनियन नागरिकांनी त्याला अन्न आणि चहा दिला. इतकेच नव्हे तर त्यांनी त्याला आपल्या आईशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याची संधीही दिली. या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. ज्यातून या युद्धाच्या संकटकाळातही माणूसकी आजही जिवंत असल्याचे दिसत आहे.

असाच अजुन एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. एक रशियन सैनिक युक्रेनियन सैनिकांच्या जाळ्यात सापडतो. पण युक्रेनियन सैनिक त्याच्यावर हल्ला न करता त्याच्या हातात सिगारेट दिली. या प्रसंगातूनही असेच दिसून येते की युद्ध एकीकडे आणि माणूसकी एककीकडे.

दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धाला नेमकी दिशा नसल्याने सैरभैर झालेले रशियन सैनिक आपल्याच वाहनांचे नुकसान करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या युद्धात रशियन सैनिकांना पुरेसा अन्नपुरवठा होत नाही. यातच इंधनाचा पुरवठाही अपुरा आहे. यामुळे सैनिकांचे मनोबल कमी झाले आहे. यातच त्यांना दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सैनिक सैरभैर झाले आहेत. ते सैन्याच्या वाहनांची मोडतोड करून पुढे युद्ध करण्यासाठी जाणे टाळत आहेत. अनेक सैनिक नैराश्यग्रस्त होऊन रडताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT