joe biden sarkarnama
देश

russia ukraine war : जो बायडन यांनी सूचवले दोन पर्याय

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता दोन देशांपुरते मर्यादित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण जग युद्धाच्या खाईत ढकलले जाण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामा ब्युरो

कीव : रशिया-युक्रेन युद्ध आता जागतिक स्वरुप घेत आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा चौथा दिवस उजाडला आहे. रशियाविरोधात (russia)जगातले इतर देश एकत्र येत असल्याचे समोर येत आहे. जागतिक पटलावरील तणावात भर पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (joe biden)यांनी केलेल्या विधानाची जगभर चर्चा सुरु आहे. युक्रेन-रशिया युद्धावर त्यांनी दोन पर्याय सूचविले आहेत.

अमेरिका, ब्रिटनसह 28 देशांनी युक्रेनला (ukraine)वैद्यकीय साहित्यासह लष्करी मदत देण्याचे मान्य केले आहे. यासोबतच या देशांनी युक्रेनला शस्त्र उपलब्ध करून देण्याबाबतही सहमती दर्शवली आहे. अनेक देशांनी विविध प्रकारचे निर्बंध रशियावर लादले असून, आता युक्रेनच्या मदतीलाही काही राष्ट्रे धावून आली आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता दोन देशांपुरते मर्यादित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण जग युद्धाच्या खाईत ढकलले जाण्याची चिन्हे आहेत. रशियाकडून दिवसेंदिवस होत असलेल्या हल्ल्यांची तीव्रता वाढतच आहे. त्यातच आता रशियाला त्यांची आण्विक शस्त्र तैनात करण्यासाठी बेलारूसने आपला भूगाग उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.

''ज्या पद्धतीने रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरू आहेत, ते बघता पुढचं महायुद्ध होणार,'' असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनयांनी केलेल्या विधानाची जगभर चर्चा सुरु आहे. युक्रेन-रशिया युद्धावर त्यांनी दोन पर्याय सूचविले आहेत.

एका मुलाखतीत बोलताना राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी दोन पर्याय सूचवले आहेत. "रशियासोबत युद्ध लढून तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात करावी हाच पर्याय आहे. दुसरा पर्याय म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात जाऊन असं करणाऱ्यांना त्यासाठी एक किंमत मोजावी लागेल, हे निश्चित केलं जावं. मला असं वाटतंय की जे आर्थिक आणि राजनैतिक निर्बंध लादण्यात आले आहेत ते इतिहासातील सर्वात मोठे निर्बंध आहेत," असे बायडेन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT