Russia Ukraine War Sarkanama
देश

Russia Ukraine War : युद्ध संपता संपेना; युक्रेनकडे वेळेची कमतरता तर रशियाची प्रतिष्ठा पणाला!

Russia Ukraine War : युक्रेनसाठी काही अंशी अनुूकूल काळ

सरकारनामा ब्यूरो

Russia Ukraine War : दोन देशांच्या युद्धात सर्वात कळीचा घटक हा 'वेळ' असतो. उपलब्ध हवामान हा युद्धाचा महत्त्वाचा घटक आहे. याचे परिणाम यु्द्धावर होतात. युक्रेनमध्येसुद्धा वेळ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता हिवाळा सुरू झालेला असताना, युक्रेनसाठी युद्धाचा महत्त्वपूर्ण अनुकूल काळ आहे.

युक्रेनजवळ आता जास्त वेळच नाही. युद्धात रशियावर अधिकचा दबाव निर्माण करणे, हाच त्यांच्याजवळ जिंकण्याचा एक रस्ता उरला आहे. अशा हवामानातही युक्रेनला सातत्याने हल्ले करावे लागणार आहे. सतत हल्ले करावे लागणार आहे. नाटो संघटनेतील देशांच्या साहाय्याने रशियावर दबाव वाढू शकतो, परंतु अशा प्रकारचा अधिकचा दबाव निर्माण करण्याचे अनेक धोके देखील उद्भवू शकतात. रशिया हा देश आपल्याजवळील अण्वस्त्रांच्या वापरासह युद्धाची तीव्रता वाढवू शकतो. मात्र युक्रेनसाठी अस्तित्वाचा लढा निर्माण झाला आहे.

युक्रेन आपली अस्तित्वाची लढाई लढत आहे. तर रशियाचा हा स्वत:च स्वतःशी पुकारलेला युद्ध आहे. युद्ध जर दीर्घकाळापर्यंत चालतच राहिले तर परिस्थिती कोणत्याही बाजूने बदलली जावू शकते. पुतिन यांच्या प्रतिष्ठेचा विषय असल्याने, रशियाला युद्धातून माघार घेईल, याची शक्यचाच निर्माण होत नाही. याचा परिणाम म्हणजे,अधिक तीव्र धोक्याची परिस्थितीनिर्माण होईल. रशिया किंवा युक्रेन दोन्ही राष्ट्रे विजय मिळवल्याशिवाय समाधान मानणार नाहीत, असेच चित्र आहे.

झेलेन्स्कीचे अमेरिकेत जोरदार स्वागत :

दोन्ही देशासांठी आता करा किंवा मरा अशीच स्थिती आहे, अशा प्रकारची भीती अनेक तज्ज्ञ लोकांना वाटते. युद्धाच्या सुरुवातीला बलाढ्य रशियासोबत तणाव परिस्थिती निर्माण होईल, अशा शक्यतामुळे अमेरिका आणि इतर नाटो संघटनेतील सदस्य देशांनी युक्रेनशी सहकार्य देण्यात, त्यांच्याशी समन्वय साधण्यास सावधानता बाळगली. युक्रेनला या युद्धभूमीत काही प्रमाणात लाभलेले यश आणि रशियाची थोडीशी झालेली पीछेहाट यामुळे याची काळजी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.

अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारनकडून आता याबाबतीत अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे. नुकतेच डिसेंबर महिन्यातयुक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरात स्वागत करण्यात आले. अमेरिकेने पॅट्रियट मिसाईल आणि सोबतच मोठ्या मदतीचे पॅकेज दिले. अमेरिकेला वाटते की, युद्ध आता वेगळ्या वळणावर प्रवेश करत आहे.

पराभूत झालेले भाग युक्रेन परत मिळवू शकते :

या हिवाळी वातावरणात युक्रेनचे मोठ्या आक्रमणाच्या तयारीने रशियाच्या पूर्वेकडील भागावर हल्ला करू शकतो. गमावलेले प्रदेश पुन्हा मिळवणे आणि रशियन सैन्याचा उच्चाटन करणे, असा रोख त्यांचा असेल. अशा स्थितीत रशियाच्या नागरिकांना ऐन हिवाळ्यात विश्रांती घेण्याची संधी मिळणार नाही. युक्रेनचकडचे सैन्यही चांगलेच थकलेले आहे. पण, युक्रेनला आपल्या सैन्यात पुन्हा उर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. जर युक्रेन ही गोष्ट केली तर मार्च महिन्यापर्य़ंत युद्धात चांगल्या स्थितीत असतील.

प्रदीर्घ युद्धात रशियाचा वरचष्मा :

दीर्घकाळीन युद्धात रशियाचा वरचढ असणार आहे. अशात चीन आणि इराण इतर काही देशांची यात हस्तक्षेप आणखीनच वाढेल. युद्ध दीर्घकाळापर्यंत चालतच राहिले तर इतर देशही यात पुढाकार घेतील नाटो संघटनेच्या सदस्य देशांना रशियावर आर्थिक निर्बंध लादणे कठीण होऊन जाईल.

रशियाची रणनीती शत्रूचा पराभव करण्याची ;

रशियाला ही गोष्ट समजून घेतली आहे की, दीर्घकालीन युद्धामुळे युक्रेनसोबत इतर देशांचे सहकार्य व समन्वय कमी कमी होत जाईल. रशियाची एकमेव उद्दीष्ट्य म्हणजे शत्रूचा पराभव करायचा असाच आहे. परंतु यात काही धोके देखील आहेत. अशा स्थितीमध्ये लढाई जिंकण्यासाठी नाही तर पराभूत होण्यासाठी लढली जाते. काही प्रमाणात सामरिक साधनसामग्रीचा अभाव, अंधाधुंद हल्ले आणि आपल्या काही कमांडर्सच्या मृत्यूने रशियाची पडती बाजू समजून गेली आहे. दुसरीकडे युक्रेनकडून योग्य पद्धतीने हल्ले होत आहेत. युक्रेनचीस रणनीतीचे परिणाम दिसू लागले आहेत.

इतिहासाकडे पाहिले तर असे हिवाळी युद्ध (रशिया-फिनलंड) वाटाघाटीच्या पातळीवर संपुष्टात आले आहेत. रशियन लष्कराला पराभूत करूनही, केवळ शांतता प्रस्थापित करण्यासाठी फिनलंड या देशाला आपली काही भूमी रशियाला द्यावी लागली.

फिनलंडने सोव्हिएत युनियनचा पराभव केला :

फिनलँड साऱख्या चिमुकल्या देशाने हिवाळी युद्धात बलाढ्य सोव्हिएत रशियाचा पराभव घडवून आणला होता. नोव्हेंबर 1939 मध्ये रशियाच्या स्टॅलिनने फिनलंडवर हल्ला केला. पश्चिम युरोपमध्ये हिटलरच्या हल्ल्यांदरम्यान फिनलंडकडून सोव्हिएत युनियनला हानी पोहोचेल, अशी भीती स्टॅलिनला वाटत होती.तत्कालीन वर्षी सोव्हिएत आर्मीने पूर्व पोलंडवर आक्रमण केले होते. रशियाचे आताचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याप्रमाणे त्यावेळी स्टॅलिन यांनाही त्यांच्या लष्करी क्षमतेवर जास्तीचा आत्मविश्वास होता. फिनलंडचा राष्ट्रीय अभिमानाला त्यांना आव्हाने दिले, फिनलँडच्या लोकांना लढाऊ क्षमतेला त्यांनी कमी लेखले. शेवटी फिनलंडकडून रशियाला पराभव स्विकारावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT