Vladimir Putin | Russia Ukraine War News Updates Sarkarnama
देश

पुतीन बिथरले; जगानं फास आवळल्यानंतर युक्रेनला दिली धमकी

रशिया आणि युक्रेन युध्दाचा आजचा अकरावा दिवस आहे. रशियाने हे युध्द थांबवावे, असं आवाहन जगातील बहुतेक देशांनी केलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मॉस्को : रशिया आणि युक्रेन युध्दाचा (Russia Ukraine War) आजचा अकरावा दिवस आहे. रशियाने हे युध्द थांबवावे, असं आवाहन जगातील बहुतेक देशांनी केलं आहे. पण पुतिन मागे हटण्यास तयार नसल्याने अमेरिकेसह (America) अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. तसेच उद्योग, खेळ आदी क्षेत्रांमध्येही विविध संघटना, कंपन्या रशियाशी नातं तोडत आहे. त्यामुळे रशिया (Russia) एकटा पडू लागल्याचे चित्र आहे. याचा राग रशियाने युक्रेनवर काढण्यास सुरूवात केली आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनला अस्तित्वावरूनच धमकी दिली आहे. आतापर्यंत रशियाने अनेक शहरांवर कब्जा मिळवला आहे. रशियन फौजा आता राजधानी कीवच्या (Kyiv) जवळ पोहचल्या आहेत. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा जीव गेल्याचा दावा युक्रेनकडून (Ukraine) करण्यात आला आहे. तसेच 10 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचेही युक्रेननं म्हटलं आहे. पण या युध्दामुळे जगातील अनेक देशांनी रशियाच्या नाड्या आवळल्या आहेत.

अमेरिकेतील दिग्गज कंपनी असलेल्या व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपनीनी रशियातील काम थांबवले आहे. त्याआधी अमेरिकेसह इतर देशांनी रशियावर अनेक कडक निर्बंध लादले आहेत. युध्द थांबवले नाही तर अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अनेक देशांनी दिला आहे. पण रशिया मागे हटण्यास तयार नाही. उलट त्यानंतर रशियाने युक्रेनला देशाचा दर्जा संपवण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेनच्या युध्दात आता ईस्त्राईलने उडी घेतली आहे. ईस्त्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी शनिवारी अचानक मॉस्कोमध्ये दाखल झाले अन् त्यांनी पुतिन यांचीशी चर्चा केली. दोघांमध्ये सुमारे तीन तास बैठक झाली. अमेरिका प्रशासनामुळे ही अघोषित बैठक झाल्याचे नफ्ताली यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. पुतिन यांच्याशी चर्चेनंतर नफ्ताली यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की (volodymyr zelenskyy) यांच्याशीही चर्चा केली. झेलेन्स्की यांनी ईस्त्राईला मध्यस्थी करण्याची विनंती केली.

जो बायडन (Joe Biden) यांनीही शनिवारी झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी युक्रेनसाठी सुरक्षा आणि आर्थिक मदतीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. आठवडाभरात दोन्ही नेत्यांमध्ये दुसऱ्यांचा चर्चा झाली आहे. रशियाने शनिवारी युक्रेनमधील मारियुपोल आणि वोल्नोवाखा मध्ये युध्दविराम दिला होता. पण काही वेळानंतर पुन्हा हल्ले सुरू करण्यात आले आहे. विदेशी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT