russia ukraine war sarkarnama
देश

russia ukraine war :राष्ट्राध्यक्ष झेलेस्कींना मारण्याचा प्रयत्न

गेल्या नऊ दिवकसांमध्ये रशियाने युक्रेनवर 500 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.

सरकारनामा ब्युरो

कीव : युक्रेन आणि रशिया दरम्यान युद्धाचा (russia ukraine war)आजचा 10 वा दिवस आहे. रशिया सैन्याने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक महत्वाची शहरं उद्ध्वस्त केली आहेत. तसेच युक्रेनचे लष्करी तळ, अणु ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले चढवले आहेत. प्रचंड विध्वंस होऊनही दोन्ही देशांमधील युद्ध थांबताना दिसत नाही.

रशियाकडून वारंवार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (volodymyr zelenskyy) यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरु आहेत.रशियाने युक्रेनवर तुफान हल्ला चढवत आता हवाई वाहतूकही ताब्यात घेतली आहे. गेल्या नऊ दिवकसांमध्ये रशियाने युक्रेनवर 500 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.

या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनचे लष्करी तळ, अणु ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले चढवले आहेत. शनिवारी राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांच्या घराजवळ रॉकेटचे काही भाग आढळून आले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष निवास स्थानाला मिसाईल हल्ल्याने उडवून देण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे म्हटले जातेय. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितनाही झालेली नाही तसेच राष्ट्रपतींच्या निवासस्थानाचेही नुकसान न झाल्याचे वृत्त आहे.

झेलेन्स्की यांनी स्वत: या मिसाईल हल्ल्याची माहिती दिली आहे. रशियाला राष्ट्रपती भवनावर हल्ला करायचा होता मात्र निशाणा चुकला. यापूर्वी देखील रशियाने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. युद्ध सुरु झाल्यापासून रशियाने कट रचून तीन वेळा झेलेन्स्की यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र यातून ते सुखरूप वाचले अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी रशियाच्या विरोधात लढताना आता थेट जगालाही धमकी दिली आहे.

नो फ्लाईंग झोनबाबत झेलेंस्की यांनी NATO वर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, युक्रेनला मदत न करणं या NATO च्या निर्णयाचा अर्थ युक्रेनवर आणखी हल्ले सुरूच राहतील किंवा वाढण्याची शक्यता आहे. हे युद्ध थांबवण्यात यावे अशी मागणी आता रशियामधीलच नागरिकांकडून होऊ लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रशियामध्ये फेसबूकवर बंदी घालण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या 229 भारतीय नागरिकांना घेऊन इंडिगोचे विशेष विमान आज सकाळी रोमानियातील सुसेवामधून दिल्लीला पोहोचले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT