Russia Ukraine War क्षेत्रफळाच्या बाबतीत रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. जगातील एकूण भूभागापैकी ११ टक्के भूभाग एकट्या रशियाकडे आहे. रशियाला 36000 किमी लांबीची किनारपट्टी लभाली आहे. रशियाच्या सीमा 17 दशलक्ष चौरस किमीमध्ये पसरलेल्या आहेत. असे असूनही, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे मुख्य कारण म्हणजे युक्रेनचा भूभाग जोडणे. शेवटी, रशियासाठी युक्रेन महत्त्वाचे का आहे ? चला समजून घेऊया.
युक्रेनचा भूगोल त्याला खास बनवतो. युक्रेन हा रशियानंतर युरोपमधील दुसरा सर्वात मोठा देश आहे. रशियाची किनारपट्टी लांब असली तरी उत्तर गोलार्धात असल्याने वर्षांतील काही महिने समुद्रातील पाणी गोठलेलेच असते. त्यामुळे तेथे चांगली बंदरे स्थापन करता येत नाहीत. व्यापारासाठी वर्षभर बंदरे उपलब्ध असणे आवश्यक आहेत आणि त्यासाठी उबदार पाण्याचे किनारे असायला हवेत. ही युक्रेनची खास गोष्ट आहे. युक्रेनचा किनारा काळ्या समुद्राच्या सीमेवर आहे, जो भूमध्य समुद्राला जोडतो. त्यातून जगभरातील व्यापाराचा मार्ग मोकळा होतो. रशियासाठी तो खजिन्यापेक्षा कमी नाही.
युएसएसआरच्या पतनानंतर, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान रशियाकडे गेले, तर रोमानिया, लिथुआनिया इत्यादी पश्चिम आणि नाटोमध्ये सामील झाले. युक्रेन मध्येच अडकला. युक्रेनच्या पूर्व भागाने रशियाला पाठिंबा दिला तर पश्चिम भागाने युरोपियन युनियनला पाठिंबा दिला.
युक्रेनमध्ये क्रिमियाच्या दक्षिणेकडील भागात सेवास्तापोलच्या नावाचे गरम पाण्याचे बंदर आहे. व्यापाराच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. रशियाकडे हे गरम पाण्याचे बंदर वापरण्यासाठी आणि व्यापारासाठी आपली जहाजे चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. परंतु जर युक्रेन युरोपियन युनियन किंवा नाटोमध्ये सामील झाले तर सेवास्तापोल बंदर आपण गमावून बसू असा रशियाला चिंता होती.
भूमध्य समुद्रात जाण्यासाठी रशियाला अजूनही नाटो सदस्य तुर्कीच्या नियंत्रणाखालील बॉस्फोरस वाहिनी पार करावी लागते. तुर्की रशियन व्यापारी जहाजे पास करण्यास परवानगी देते, परंतु रशियावर दबाव आणण्यासाठी ते कधीही थांबवू शकते. त्यामुळे रशियाने युक्रेनला पश्चिमेकडे जाऊ न देणे अत्यावश्यक आहे.
युक्रेन कधी युरोपियन युनियनशी तर कधी रशियाशी स्वत:च्या हितासाठी मैत्री करत आहे. 2013 मध्ये, जेव्हा युक्रेनने युरोपियन युनियनमध्ये प्रवेश करणे अपेक्षित होते, तेव्हा पुतिन यांनी त्वरीत क्रिमियाला जोडले आणि बंदर स्वतःसाठी घेतले. युक्रेनने युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याची योजना सोडली, परंतु क्रिमियावरील नियंत्रण गमावले.
युक्रेन स्वतःला नाटोशी जोडण्याचा प्रयत्न करत होता. तसे झाले तर अमेरिका युक्रेन, रोमानिया आणि तुर्कस्तानचा वापर करून रशियाचा व्यापार खंडित करू शकतो. महासत्ता रशिया असा धोका पत्करू शकत नाही, त्यामुळे युक्रेनला पुन्हा गुडघे टेकण्यासाठी पुतिन यांनी लष्करी कारवाई सुरू केली आहे. या युद्धाचा परिणाम पुन्हा जगाचा नकाशा बदलू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.