Vladimir Putin News in Marathi
Vladimir Putin News in Marathi sarkarnama
देश

जग हादरलं : पुतीन यांचा मृत्यू ? ; तोतया सांभाळतोय रशियाचा कारभार

सरकारनामा ब्युरो

लंडन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारानं मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. "व्लादिमीर पुतीन (vladimir putin) यांचा आधीच मृत्यू झाला असून त्यांच्यासारखी हुबेहुब व्यक्ती सत्ता चालवते," असा दावा गुप्तचर यंत्रणेने कला आहे. या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. (Vladimir Putin News in Marathi)

ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा (Britain's Spy Agency) असलेली MI6 च्या प्रमुखांनी हा दावा केला आहे. यात त्यांनी पुतीन यांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली आहे. ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळानं द डेली स्टारच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.

पुतीन यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य काही आठवडे किंवा महिनाभर जगापासून लपवून ठेवावे लागणार आहे.पुतीन यांचे सार्वजनिक कार्यक्रम त्यांच्या मृत्यूपूर्वीच रेकॉर्ड करुन ठेवण्यात आले आहेत.आणि त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून जगासमोर ठेवण्यात येत आहे. त्यामुळं पुतीन यांच्यासारखा दिसणारा एक तोतया आता रशियाचा कारभार सांभाळत आहे, असा दावा करण्यात येत आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये दोन महिन्यांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. काही दिवसांपासून पुतीन यांची तब्येतही बिघडल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ६९ वर्षीय पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी केला.

पुतिन यांना कॅन्सर झाला असल्याचं म्हटलं जात होतं. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पुतीन युद्धाच्या काळात सुट्टीवर जाणार होते. याकाळात त्यांचं एक ऑपरेशन होणार होतं.पुतीन यांना रक्ताचा कर्करोग झाला असून त्यांची तब्येत खालावली आहे. युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधी त्यांच्यावर एक शस्त्रक्रियादेखील झाली आहे, असा दावा दोन आठवड्यांपूर्वी रशियाच्या उद्योगपतीच्या निकटवर्तीयांनी केला होता.

रेकॉर्ड केलेला जुना व्हिडीओ

शेवटी पुतीन माध्यमांसमोर दिसले तो व्हिडीओ आधीच रेकॉर्ड केलेला जुना व्हिडीओ असू शकतो. रशियाच्या विजय दिनाच्या दिवशी मॉस्कोत दिसलेले पुतीन म्हणजे त्यांचा बहुरुप्या असू शकतो. पुतीन खूप आजारी आहेत आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही बातमी अनेक दिवस लपवून ठेवली जाऊ शकते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT