West Bengal News : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. सुमारे ६० हून अधिक आमदारांसह २० खासदारांनी बंडाचे निशाण फडकावले. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या खासदार सायोनी घोष यांनी बंड केले. ममतादीदींसाठी हा मोठा धक्का होता. सायोनी यांनी अद्याप यावर जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
बंड केल्यापासून सायोनी घोष अद्याप मतदारसंघात फिरकल्या नसल्याचे सांगितले जाते. तसेच त्या महिनाभरापासून सोशल मीडियातही सक्रीय नाहीत. मात्र, त्यांच्या जाधवपूर मतदारसंघातील एका घटनेने संपूर्ण बंगाल हादरल्यानंतर घोष यांही खडबडून जाग्या झाल्या आहेत. बारूईपूर या भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर सायोनी यांनी एक्सवर पोस्ट करत निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आरोपींना अटक केली आहे. एसआयटी स्थापन केली आहे. मी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईल आणि लवकरच न्याय मिळेल.
सायोनी यांनी यापूर्वी ८ जूनला एक्सवर शेवटी पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांनी ५ जुलै रोजी पोस्ट केली आहे. मात्र, या पोस्टमध्ये मतदारसंघात जाण्याबाबत त्यांनी भाष्य केलेले नाही. या पोस्टवरून त्यांना ट्रोलही करण्यात आले आहे. सायोनी या ममतादीदींच्या अत्यंत विश्वासू नेत्या मानल्या जात होत्या. त्यांची ही खासदारकीची पहिलीच टर्म आहे.
विधानसभा निवडणुकीत सायोनी यांनी आपल्या अनोख्या प्रचाराने रंगत आणली होती. काही मुद्यांवरून वादही निर्माण झाला होता. आपमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार राघव चड्ढा यांच्याबाबत केलेले त्यांचे विधानही चांगलेच गाजले होते. त्यांनी दीदींची साथ सोडल्यानंतर या विधानाचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.