Sachin Pilot Sarkarnama
देश

Rajasthan Election : सचिन पायलटांचा कॉन्फिडन्स; म्हणाले, परंपरा मोडणार...राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचेच सरकार बनणार

Sachin Pilot News : सचिन पायलट यांनी त्यांच्या टोंक मतदारसंघात माध्यमांशी संवाद साधला.

Amol Jaybhaye

Rajasthan Assembly Election : राजस्थानमधील प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सरकार बदलण्याची परंपरा या वेळी खंडित होऊन राज्यात पुन्हा काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन होईल, असा विश्वास काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी बुधवारी पुन्हा एकदा व्यक्त केला. यासोबतच प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष विकासाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सचिन पायलट यांनी त्यांच्या टोंक मतदारसंघात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजस्थानमध्ये तीस वर्षांपासून चालत आलेली परंपरा म्हणजे भाजप (BJP) पाच वर्षे आणि काँग्रेस पाच वर्षे... ती परंपरा आता खंडित होणार आहे. केंद्रातील भाजपची दहा वर्षांची सत्ता जनतेने पाहिली असून त्यांना बदल हवा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पायलट बुधवारी त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मेहगाव आणि शिवपुरी येथून निवडणूक प्रचाराला सुरूवात केली आहे.

लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मात्र, आमचा मुद्दा विकासाचा आहे. पक्ष एकजुटीने निवडणूक लढवत आहे, त्यामुळे राजस्थानमध्ये आम्ही सरकार स्थापन करू, असे ते म्हणाले. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) आम्ही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत. तेलंगणातही धक्कादायक निकाल लागतील आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होईल.

या चार-पाच राज्यांमध्येही आमचे सरकार स्थापन झाले तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (इंडिया) मजबूत होईल. ही आघाडी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवेल, असेही ते म्हणाले. राजस्थानच्या 200 विधानसभा जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT