Sameer Wankhede and Dyandev Wankhdede
Sameer Wankhede and Dyandev Wankhdede Sarkarnama
देश

नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडेचा बाप बोगस होता... पण ते नेमके होते तरी कोण?

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : समीर वानखेडेचा बाप बोगस, तो स्वतः बोगस तसेच त्याच्या घरातले बोगस आहेत, असे म्हणत काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर टीका केली. या टीकेमुळे राज्यात आर्यन खानच्या अटकेनंतर सुरु असलेले राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. मलिक पुढे बोलताना म्हणाले, येत्या वर्षभरात समीर वानखेडेची नोकरी जाईल, बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर तो एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही. आगामी काळात त्याचा तुरुंगवास निश्चित आहे. आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी पुढे आलेल्या समीर वानखेडेचा तुरुंगवास या देशातील जनता पाहील असेही मलिक म्हणाले.

नवाब मलिक मागच्या काही काळापासून सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टिका करताना दिसून येत आहेत. मात्र काल पहिल्यांदाच त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्या वडिलांवर टीका केली. ते बोगस असल्याचे म्हणाले. मात्र याच पार्श्वभुमीवर समीर वानखेडे यांचे वडिल नेमके कोण होते हे बघणे महत्वाचे आहे. समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) हे देखील एक पोलीस अधिकारी होते, जे सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातुन ते १९७५ साली मुंबईत आले. सुरुवातीला ते पोलिस उपनिरीक्षक होते. त्यानंतर एक एक पायरी चढत ते अधिकारी पदावर पोहोचले. ते सांगतात मी स्वतः देखील ४ ते ५ ड्रग्जच्या केसेस हाताळल्या आहेत. मी कोणालाही घाबरणारा किंवा कोणाच्याही कोणत्याही धमक्यांना भीक घालणारा नव्हतो.

ज्ञानदेव वानखेडे सांगतात, वानखेडेंच्या घरात मुलगा आणि मुलगी यात असा काही भेदभाव नव्हता. समीर वानखेडे आणि जश्मीन वानखेडे हे दोघेही एकत्रच वाढले. या दोघांनी मला वर्दीत पाहिले होते. दोघांनीही माझ्याकडून प्रेरणा घेत माझ्याच पावलावर पाऊल टाकले. जश्मीन वानखेडे या व्यवसायाने क्रिमिनल लॉयर आहेत. तर समीर एनसीबीच्या मुंबई कार्यालयात प्रादेशिक संचालक आहेत. एक पालक म्हणून समीर जे काही समजासाठी काम करतोय, नशामुक्तीसाठी करत असलेल्या त्याच्या कामाचे लोकांनी कौतुक करायला हवे. पण त्याच्या धाडसी कारवायांमुळे एक पालक म्हणून भीती समीर वानखेडेंच्या वडिलांनी व्यक्त केली होती.

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर सांगतात, समीर यांच्या डॅशिंग करिअरच्या मागे त्यांचे वडिलच आहेत, ते प्रत्येकवेळी समीर यांना मार्गदर्शन करत असतात क्रांतीने सांगितले की, 'जेव्हाही समीर कोणत्या समस्येत अडकतात किंवा त्यांना कोणता निर्णय घेताना त्रास होतो, तेव्हा ते त्यांच्या वडिलांशी संपर्क साधतात. ते समीर यांच्या जीवनात मार्ग दाखवऱ्या प्रकाशासमान आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT