नवाब मलिक   सरकारनामा
देश

क्रूझ पार्टीतील 'दाढीवाला' आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया वानखेडेंचा खास दोस्त !

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मागच्या काही दिवसांपासून मलिक सातत्याने पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांच्यावर खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचे, शाहरुख खान कडून खंडणी वसूल केल्याचे आरोप करत आहेत. आता मलिकांनी आज क्रूझ पार्टीतील 'तो दाढीवाला' आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया वानखेडेंचा खास दोस्त असल्याचा मोठा आरोप केला आहे.

मलिक म्हणाले, जे तपासासाठी आले आहेत त्यांना मी अजून एक सांगू इच्छितो, जी पार्टी झाली, ती फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही परवानगी शिवाय, कोणत्याही कोरोना नियमांचे पालन केल्याशिवाय सरळ डायरेक्टर सीपींची परवानगी घेत ही पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत टार्गेटेड लोकांचे फोटो देत त्यांना ट्रॅप केले गेले. पण माझ्या माहिती प्रमाणे त्या क्रूझ पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलरही होता. त्याची एक साथीदार देखील बंदुकीसह त्या पार्टीत होती.

हे लोक त्याठिकाणी डान्स करताना दिसून आले. तो दाढीवाला कोण आहे हे एनसीबीच्या लोकांना माहित आहे. त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. जाणीवपूर्वक ही पार्टी आयोजित केली गेली. तरीही एनसीबीच्या प्रमुखांना तो दाढीवाला सापडत नसेल तर त्यांनी माझ्याकडे यावे, मी त्यांना नावासहित फोटो देईल. मला मिळालेल्या माहिती प्रमाणे यापुर्वी तो दाढीवाला दिल्लीच्या तिहाड आणि राजस्थानच्या तुरुंगामध्ये होता. याकडे देखील चौकशीला आलेल्यांनी लक्ष द्यावे, असे मलिक म्हणाले.

याच दाढीवाल्याची मैत्री वानखेडेंसोबत आहे. काही अधिकारी मला सांगतात की या दाढीवाल्याचे गोव्यात देखील अवैध उद्योग चालु असतात, पण वानखेडे त्याकडे साफ दूर्लक्ष करतात. असे काही गंभीर आरोप मलिक यांनी केले. त्यामुळे क्रुझवरील सीसीटीव्ही तपासुन याचा खोलात जावून तपास करावा. त्यामुळे आता खेळ संपला आहे, पण खिलाडी अजूनही दाढी घेवून मोकाट फिरत आहे. येणाऱ्या दिवसात याबाबत अजूनही काही खुलासे करणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

नवाब मलिक म्हणाले,

- ड्रग्ज पार्टीचा तपास भटकवण्यासाठी सातत्याने मी वेगवेगळे आरोप करत असल्याचे म्हंटले जात आहे. पण हे मी केवळ जे काही चुकीचे आहे त्यावर बोलत आहे.

- जी समिती आली आहे, त्यांनी समीर वानखेडे, किरण गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडे यांचा ड्रायव्हर यांची चौकशी करावी, सीडीआर तपासावा. जर इलेक्ट्रोनिक तपास झाला तर कोणचाही जबाब नोंदवण्याची गरज पडणार नाही.

- एक गुन्हा आधी पासून नोंद आहे, ज्याला एक वर्ष झाले पण त्यात आजतागायत एकही अटक झालेली नाही. यात अभिनेत्री दिपीका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांना बोलावले, पण अटकेची कारवाई झाली नाही. या सगळ्या प्रकरणांच्या खोलात जावे, नक्कीच सत्य सापडेल.

समीर वानखेडेंच्या मालदिव दौरा तपासावा :

समीर वानखेडेंच्या मालदिव दौरा तपासावा, असे ही मलिक यांनी चौकशी समितीला सुचवले. ते पुढे म्हणाले, त्यावेळी कोण कोण अभिनेता, अभिनेत्री मालदीवमध्ये होते याची चौकशी करावी. त्यानंतर जे वसुलीचे काम सुरु आहे याबाबत सर्व माहिती समोर येईल. तपास सुरु आहे, अजून यात अनेक खुलासे होणे बाकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT