bihar cm samrat chaudhary wealth details shocking Sarkarnama
देश

Samrat Chaudhary net worth : बिहारचे मुख्यमंत्री होणारे सम्राट चौधरींचे शिक्षण किती? संपत्तीही अमाप, आकडा वाचून व्हाल थक्क!

Samrat chaudhary education qualification : बिहारचे संभाव्य मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे शिक्षण, संपत्ती, राजकीय प्रवास आणि थक्क करणारी माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

बिहारच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड घडताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सम्राट चौधरी यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याने नवीन राजकीय पर्वाची सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. बिहारमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या लोकांमध्ये त्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या मालमत्तेचे आकडे पाहिले तर अनेकांना आश्चर्य वाटू शकते.

सम्राट चौधरी यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला आणि विद्यार्थी संघटनांमधून आपली कारकीर्द सुरू केली. पुढे त्यांनी हळूहळू राज्याच्या राजकारणात आपली मजबूत ओळख निर्माण केली.

आता त्यांच्या संपत्तीबद्दल पाहिले तर, त्यांच्या नावावर एकूण सुमारे 4.85 कोटी इतकी मालमत्ता आहे. यामध्ये 99 लाख इतकी चल मालमत्ता आहे, ज्यात बँक बॅलन्स, रोख रक्कम आणि इतर गुंतवणूक समाविष्ट आहे. तसेच 3.86 कोटी इतकी अचल मालमत्ता आहे, ज्यात जमीन आणि घरे यांचा समावेश होतो.

सम्राट चौधरी यांच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणात शेतीजमीनही आहे. मुंगेर जिल्ह्यातील तारापूर, वैशालीमधील मनीकपूर आणि करिहो या भागांत शेकडो एकर शेतीजमीन आहे. याशिवाय पटण्यातील तारापूर आणि खाजपूरा भागात बिगरशेती जमीनही आहे. त्यांच्या कुटुंबाकडे सुमारे 400 ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत सुमारे 40 लाख इतकी आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 500 ग्राम चांदी आहे, ज्याची किंमत सुमारे 75 हजार आहे.

त्यांच्या पत्नी कुमारी ममता यांच्या नावावरही मोठी मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर एकूण 5.78 कोटी इतकी संपत्ती आहे. यामध्ये 27.89 लाख चल मालमत्ता आणि 5.50 कोटी पेक्षा जास्त अचल मालमत्ता समाविष्ट आहे. दोघांची मिळून एकूण कुटुंबीय संपत्ती सुमारे 11.34 कोटी इतकी होते.

सम्राट चौधरी हे बिहारमधील अनुभवी राजकारणी मानले जातात. त्यांचे वडील शकुनी चौधरी हेही राज्यातील प्रसिद्ध नेते होते, त्यामुळे त्यांना राजकारणाचा वारसा लाभला. त्यांनी विविध पक्षांमध्ये काम करत अखेरीस भारतीय जनता पक्षात स्वतःची मजबूत ओळख निर्माण केली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी वित्त आणि इतर महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली आहे.

आता मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्यासमोर विकासाला गती देणे, रोजगारनिर्मिती वाढवणे आणि कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवणे ही मोठी आव्हाने असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT