Samrat Choudhary political career and background Sarkarnama
देश

Samrat Choudhary : भाजपमध्ये येताच थेट मुख्यमंत्रीपदाची लॉटरी? कोण आहेत सम्राट चौधरी?

Who is Samrat Choudhary Bihar BJP leader: बिहारच्या राजकारणात सध्या एक नाव जोरात चर्चेत आहे ते म्हणजे सम्राट चौधरी. कधी काळी नितीश कुमारांचे कट्टर विरोधक असलेले सम्राट आता त्यांच्याच उत्तराधिकारी म्हणून पुढे येत आहेत.

Rashmi Mane

How Samrat Choudhary became Bihar CM BJP: बिहारच्या राजकारणात सध्या एक नाव जोरात चर्चेत आहे ते म्हणजे सम्राट चौधरी. कधी काळी नितीश कुमारांचे कट्टर विरोधक असलेले सम्राट आता त्यांच्याच उत्तराधिकारी म्हणून पुढे येतील का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाने घेतलेली झेप अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे.

16 नोव्हेंबर 1968 रोजी जन्मलेले सम्राट चौधरी हे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे बिहारमधील प्रभावी नेते होते. त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाची ओळख त्यांना झाली. जवळपास 35 वर्षांचा त्यांचा राजकीय अनुभव आहे.

सम्राट चौधरी यांचे मूळ गाव मुंगेर जिल्ह्यातील तारापूर आहे आणि ते सध्या त्याच मतदारसंघाचे आमदार आहेत. या भागात त्यांच्या कुटुंबाची मजबूत राजकीय पकड आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत.

सम्राट चौधरी हे जातीय समीकरणाच्या दृष्टीने ते कुशवाहा समाजातून येतात, जे बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जाते. नितीश कुमार यांनीही ‘लव-कुश’ समीकरणावर राजकारण उभे केले होते. यामुळे सध्याच्या परिस्थितीत सम्राट चौधरी यांना पुढे आणणे हे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.

राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात

सम्राट चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय जनता दलसोबत केली होती. राबडी देवी यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. मात्र, 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत गेला. 2020 नंतर सुशील कुमार मोदी यांना दिल्लीला पाठवण्यात आल्यानंतर बिहार भाजपमध्ये सम्राट चौधरी यांचा प्रभाव अधिक वाढला. तब्बल नऊ वर्षांतच त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी.

एक काळ असा होता की त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, 2024 मध्ये नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये आल्यानंतर सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आणि त्यांच्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले.

बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत

आजच्या घडीला सम्राट चौधरी हे बिहार भाजपचे प्रमुख चेहरे बनले आहेत तर मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.

सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार?

त्यातच बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताबदल निश्चित मानला जात आहे. भाजपने सम्राट चौधरी यांची विधायक दलाच्या नेतेपदी निवड केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची शक्यता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT