Sanjay Raut Letter To Vice President  Sarkarnama
देश

"फक्त २०२४ पर्यंत थांबा; त्यानंतर..." संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

NCP | Nawab Malik | ED | Sanjay Raut : नवाब मलिक यांना ईडीने कार्यालयात नेले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांच्यावर आज सकाळी ईडीने कारवाई केली आहे. सकाळी ७ वाजता ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे. मात्र मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले असल्याचीही माहिती आहे. मलिक सध्या ईडीच्या कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरु आहे.

नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनिलाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु असल्याचे ही कळत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांबाबत अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान मलिक यांच्यावरील कारवाईवर बोलताना संजय राऊत म्हणाले, नवाब मलिक किंवा आम्ही जे सातत्याने बोलत आहेत, असत्याचा पर्दाफाश करत आहोत, मुखवटे काढत आहोत, त्यांच्या मागे देशभरामध्ये ईडी, सीबीआय लावले जात आहेत. नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी ईडीचे अधिकारी आले त्यांना घेवून गेले. त्यांची चौकशी होईल, आम्ही वाट बघत आहोत. ते नक्कीच संध्याकाळी घरी येतील आम्हाला खात्री आहे. पण महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला चौकशी यंत्रणा येतात आणि घेवून जातात, ठिक आहे पण ही चौकशी २०-२५ वर्षांनी चौकशी करत आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले, किरीट सोमय्यांनी ईडीकडे हे प्रकरण दिले आहे. पण आता भाजपा नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणं ईडीकडे देणार आहोत. भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का? २०२४ नंतर मात्र हे चित्र वेगळे असेल. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. मलिक सत्य बोलत आहेत, त्यांना चौकशीसाठी नेले आहे, हे महाराष्ट्र सरकारसमोर आव्हान आहे. तसेच २०२४ नंतर आम्ही सुध्दा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावू, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT