sajay raut, Narendra Modi sarkarnama
देश

'मोदी-शहांनी काही काळ राजकारण बाजूला ठेवून कश्मीरी पंडितांच्या घरवापसीवर लक्ष द्यावे'

नुसते पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही, तुम्हा काय कठोर पावलं उचलली हे महत्वाचे आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काश्मीरचा माहोल पुन्हा एकदा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. याकडे खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी अत्यंत गांभीर्याने बघीतले पाहिजे. काही काळ निवडणुकांचे राजकारण दूर ठेवत कश्मीरी पंडितांच्या घरवापसीकडे लक्ष द्यावे, असा टोला शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली आहे. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले, नुसते पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही, तुम्हा काय कठोर पावलं उचलली हे पहाव लागणार आहे. भाजपचा (BJP) कश्मीर मुद्दा हा मुख्य अजेंडा होता. त्यासाठीच 370 कलम हटवण्यात आले आणि कश्मीरचे विभाजन करण्यात आले आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तरीही कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही. काश्मीर आजही अशांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत, अशा शब्दात राऊतांनी भाजपला सुनावले आहे.

काल (ता.13 मे) बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून काश्मिरी पंडित तरूणावर गोळ्या झाडल्या गेल्या. सातत्याने काश्मिरी पंडितांच्या हत्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. येथील अन्या सामान्या नागरिकांनीही त्रास सुरू आहे. काश्मीरचा माहोल पुन्हा एकदा बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू झाला याकडे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांनी अत्यंत गांभीर्याने बघीतले पाहिजे. यासाठी काही काळ निवडणुकांचे राजकारण दूर ठेवत कश्मीरी पंडितांची घरवापसीकडे लक्ष द्यावे, असे राऊतांनी केंद्र सरकारला ठणकावले.

दरम्यान, नुसते लाऊडस्पीकर, हनुमान चालिसा असे मुद्दे घेऊन कश्मीर सारख्या विषयावरून लोकांचे मन तुम्ही विचलित करू शकत नाही. लोकांचे याकडे अत्यंत बारीक लक्ष आहे. शिवसेना कश्मीरी पंडितांच्या मुद्द्याकडे अत्यंत संवेदनशीलपणे बघते. एका बाजूला चीन घुसला तर दुसर्‍या बाजूला कश्मीर अशांत हे देशाला परवडणारे नाही, असे स्पष्ट मत राऊतांनी मांडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT