Sanjay Raut  Sarkarnama
देश

संजय राऊत बड्या नेत्याच्या भेटीला; UP निवडणुकीत शिवसेना करणार जिवाचं रान

UP assembly election : शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देशात ५ राज्यांच्या निवडणुका जाहिर (5 State Election) झाल्यानंतर त्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखवण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र याठिकाणी भाजपच पुन्हा सत्तेत येईल असा दावा पक्षाचे नेते करत आहेत. ओपिनीयन पोलनुसार देखील ५ पैकी ४ राज्यांमध्ये भाजपच पुन्हा सत्तेत येईल असा असे अंदाज दिसत आहेत. पण या आकड्यांकडे दुर्लक्ष करत समाजवादी पक्ष (Samajwadi Party), काँग्रेस (Congress), आम आदमी पक्ष (Aam Aadami party) अशा सगळ्याच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेने देखील उडी घेतली आहे.

शिवसेना (Shivsena) उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. शिवसेना गोव्यात ९ जागांवर तर उत्तर-प्रदेशमध्ये ५० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे काल शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) स्पष्ट केले आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत उद्यापासून उत्तर-प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. ते उद्या लखनौमध्ये असणार असून शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहेत. या भेटीत उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

१८ तारखेला गोव्याच्या दौऱ्यावर :

दरम्यान केवळ उत्तर-प्रदेशच नाही तर संजय राऊत गोव्यात देखील जाणार आहेत. गोव्यात शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडी करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात ते १८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीत काँग्रेससोबत आघाडीसंदर्भात चर्चा करणार आहेत. काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय अद्याप न झाल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्रित लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जर गोव्यात काही मनाप्रमाणे घडले नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्यात आणि उत्तर-प्रदेशमध्ये परिवर्तन निश्चित :

दरम्यान गोव्यात आणि उत्तर-प्रदेशमध्ये परिवर्तन निश्चित असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, गोव्यात भाजप मंत्री व आमदारांनी भाजप सोडला. म्हणजे गोव्यात भाजप अभेद्य नाही. उत्तर-प्रदेशमध्येही भाजपच्या अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. याचा अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आला आहे, असा टोला लगावत भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. गोवा व युपीत परिवर्तन निश्चित आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT