Winter Session News
Winter Session News Sarkarnama
देश

Sanjay Raut With Rahul Shewale : आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; राहुल शेवाळे अन् संजय राऊत एकत्र, पण...

सरकारनामा ब्यूरो

Rahul Shewale : एकीकडे महाराष्ट्राच्या विधानपरिषेदेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. विधानपरिषेदेचे सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी राज्य सरकारला शेवाळे यांची चौकशी व्हावी, असे निर्देश दिले आहेत. मात्र या नंतर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत आणि राहुळ शेवाळे एकत्र बसलेले आहेत.

राहुल शेवाळेंवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने थेट आरोप केले जातात. दिल्लीमध्ये मात्र शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे खासदार एकत्र चर्चा करतानाचे चित्र दिसून येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे एकत्र बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संसदेमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी एकच कार्यालय असल्याने, दोन्ही गटाचे खासदार एकाच कार्यालयात बसलेले दिसून आले. दरम्यान, या व्हिडीओमध्ये दोन्ही गटाचे नेते एकमेकांमध्ये संवाद साधताना दिसत नाहीत. मात्र या दरम्यान त्यांच्यात काही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT