Savarkar Quiz Controversy Sarkarnama
देश

Savarkar Quiz Controversy : सावरकरांचा ‘स्वातंत्र्यसैनिक’ असा उल्लेख; शालेय क्विझवरून राजकीय रणकंदन, शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Savarkar ‘freedom fighter’ reference Kerala school quiz sparks political controversy and prompts an inquiry : ‘फ्रीडम क्विझ’मध्ये ‘ब्रिटिशांकडून सर्वाधिक कठोर शिक्षा झालेला स्वातंत्र्यसैनिक कोण?’ असा प्रश्न; उत्तरात ‘वीर सावरकर’चा उल्लेख

Pradeep Pendhare

Savarkar Kerala Freedom Quiz Controversy : केरळमधील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘फ्रीडम क्विझ’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ‘स्वातंत्र्यसैनिक’ असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केरळचे शिक्षणमंत्री एन. शमसुद्दीन यांनी दिले आहेत.

कासारगोड, कुंबळा आणि मंजेश्वर उपजिल्ह्यांतील काही शाळांमध्ये 6 ऑगस्ट रोजी प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी (Student) ‘फ्रीडम क्विझ’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषेत, ‘ब्रिटिशांकडून सर्वाधिक कठोर शिक्षा झालेला स्वातंत्र्यसैनिक कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर ‘वीर सावरकर’ असे देण्यात आले.

या प्रश्नावरून केरळच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. प्रश्नमंजुषा ही शिक्षण विभागाच्या (Education) अधिकृत कार्यक्रमाचा भाग नसल्याचे शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हा प्रश्न नेमका कोणी तयार केला, याचा शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, माकपचे नेते पिनराई विजयन आणि माजी शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या प्रश्नावरून सरकारवर टीका केली. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची मांडणी बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप डाव्या पक्षांकडून करण्यात आला.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार शिक्षण क्षेत्रात संघ परिवाराचा अजेंडा आणत असल्याचा आरोपही डाव्या पक्षांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एका शालेय प्रश्नमंजुषेतील प्रश्नावरून केरळमध्ये शिक्षण, इतिहास आणि राजकीय विचारसरणीवरून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

6 ऑगस्ट रोजी कासारगोड, कुंबळा आणि मंजेश्वर उपजिल्ह्यांतील काही शाळांमध्ये ‘फ्रीडम क्विझ’ घेण्यात आली. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रश्नमंजुषेत सावरकरांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नाच्या उत्तरात सावरकरांचा ‘स्वातंत्र्यसैनिक’ असा उल्लेख करण्यात आला. या मुद्द्यावरून माकप नेत्यांनी सरकारवर टीका केली असून इतिहासाच्या मांडणीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT