देश

सावरकर साहित्य संमेलन यंदा राजधानी दिल्लीत 

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली, ता. २२ : सावरकर दर्शन प्रतिष्ठानतर्फे दिल्लीत येत्या २६ व २७ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन होणार आहे. यावेळी ‘सावरकर यांना भारतरत्न सन्मान देण्यात यावा' हा ठराव पुन्हा मंजूर केला जाण्याची शक्‍यता आहे. प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी सांगितले की, २००९ पासून दरवर्षी होणाऱ्या सावरकर साहित्य संमेलनाचे यंदाचे पर्व दिल्लीत घेण्याचे ठरविले कारण राजधानीच्या या शहरात साहित्य संमेलन घेण्यास वेगळा अर्थ आहे. सावरकरांबदद्‌लचा अपप्रचार रोखण्यासाठी सावरकरांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंची माहिती जगाला समजावी यादृष्टीने हे संनमेलन होणार आहे. 

जनपथावरील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हे संमेलन होईल. २६ फेब्रुवारीला संमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी भूषवतील. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा व सांस्कृतीक मंत्री प्रल्हाद पटेल प्रमुख पाहुणे असतील. २७ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुख्य उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल. संमेलनात होणाऱ्या विविध परिसंवादांमध्ये खासदार सुब्रह्मण्यम स्वामी, डॉ. नरेंद्र जाधव, स्वपन दासगुप्ता आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT