in second wave of covid pandemic 270 doctors have died of covid says ima
in second wave of covid pandemic 270 doctors have died of covid says ima  
देश

धक्कादायक : कोरोना विरोधातील लढाईत देशाने गमावले 1 हजार 18 डॉक्टर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असून, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यातच कोरोनामुळे डॉक्टरांचे (Doctor) मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. कोरोना महामारीत आतापर्यंत देशात 1 हजार 48 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी 748 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत 270 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीत एकूण 1 हजार 48 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कालच (ता.17) इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी अध्यक्ष डॉ.के.के.अगरवाल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

हेही वाचा : कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले आयएमएचे माजी अध्यक्ष कोरोनाशी झुंज हरले 

आयएमचे अध्यक्ष डॉ.जे.ए.जयालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू बिहारमध्ये झाले असून, तेथे 78 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश 37, दिल्ली 29 आणि आंध्र प्रदेशात 22 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी आघाडीवर लढणाऱ्या आरोग्यसेवकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला आहे. यात मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवकांचा मृत्यू होत आहे.  

देशात 24 तासांत 4 हजार 329 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 63  हजार 533 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 329 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 78 हजार 719 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर कालपासून (ता.17 मे) रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT