serum institutes ceo adar poonawalla announces trial of covovax vaccine
serum institutes ceo adar poonawalla announces trial of covovax vaccine 
देश

'सिरम'च्या अदर पूनावालांनी भारतीयांना दिली 'गुड न्यूज'!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड कोरोना लशीचा वापर भारतासह अनेक देश करीत आहेत. या लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. आता कोरोनावरील आणखी एका लशीच्या चाचण्या भारतात सुरू झाल्या आहेत, अशी माहिती सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली आहे. यामुळे सप्टेंबरअखेर सिरमची कोरोनावरील दुसरी लस भारतीयांना मिळण्याची आशा आहे. 

कोवोव्हॅक्स ही लस नोवोव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीसोबत सिरम तयार करीत आहे. या लशीची भारतात चाचणी सुरू झाली आहे. ब्रिटनमध्ये या लशीची आधी चाचणी करण्यात आली होती. यात आफ्रिका आणि ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या प्रकारावर ही लस 89 टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे. भारतात चाचण्या पूर्ण झाल्यानंतर यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतात या लशीचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे. 

याविषयी अदर पूनावालांनी म्हटल आहे की, कोवोव्हॅक्सच्या चाचण्या भारतात सुरू झाल्या आहेत. सिरम आणि नोवोव्हॅक्स यांच्या भागीदारीतून ही लस विकसित करण्यात आली आहे. आफ्रिका आणि ब्रिटनमधील कोरोनाच्या प्रकारांवर ही लस 89 टक्के प्रभावी असल्याचे स मोर आले आहे. ही लस सप्टेंबर 2021 पर्यंत प्रत्यक्षात वापरात येईल, अशी आशा आहे. 

सध्या देशात कोरोना लशींचा वापर होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

अमेरिकेत मान्यतेचा मार्ग खुला 

दरम्यान, अमेरिका, चिली आणि पेरुमध्ये झालेल्या व्यापक चाचण्यांमध्ये कोव्हिशिल्ड  लस 79 टक्के परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे या लशीला अमेरिकेत मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लस अनेक गंभीर आणि गुंतागुंतीचे आजार तसेच, रुग्णालयात दाखल रुग्णांसलाठी 100 टक्के सुरक्षित आहे. या लशीच्या चाचणीत तब्बल 32 बजार स्वयंसेवक सहभागी झाले होते आणि ते सर्व वयोगटातील होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT