Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
देश

NCP Crisis: दे धक्का ! शरद पवारांना पुन्हा हादरा; नागालँडच्या सात आमदारांचा अजितदादांना पाठिंबा

Political News: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना पंधरा दिवसांतच दुसरा मोठा धक्का

Ganesh Thombare

Nagaland : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांना पंधरा दिवसांतच दुसरा मोठा धक्का दिला आहे.

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढंच नव्हे तर नागालँडमधील आमदारांसह पक्षाच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनीही अजितदादांना पाठिंबा दर्शविला. नागालँडमधील आमदारांच्या या भूमिकेमुळे अजितदादांचं पारड जड झालं आहे.

नुकत्याच झालेल्या नागालँडमधील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. या आमदारांनी नागालँडमध्ये सत्तेत आलेल्या भाजपला पाठिंबा दिलेला आहे. आता याच आमदारांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांना आपला पाठिंबा जाहीर करत या संदर्भातील पत्र जारी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गटाचे दोन वेगवेगळे मेळावे झाले होते. या मेळाव्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी शरद पवारांची दोन वेळा भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीही त्यांनी साहेबांकडे केली होती.

पण यावर शरद पवारांनी अद्यापही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे असतानाच आता नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT