New Parliament Building news
New Parliament Building news  Sarkarnama
देश

New Parliament Building : 'किंगखान' अन् अक्षय कुमारचा Video मोदींनी केला Retweet ; म्हणाले, 'सुंदर अभिव्यक्ती...'

सरकारनामा ब्यूरो

Sengol installed in new Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचे उद्धघाटन झाले. उद्धघाटनाच्या पूर्वी मोदींनी संसद भवनाचा व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर केला. (Shahrukh Khan Akshay Kumar gives voice over new Parliament Building PM Modi Says Beautifully)

या व्हिडिओला आवाज किंवा कुठलेही पार्श्वसंगीत नव्हते. या व्हिडिओला शेअर करुन त्याला आवाज द्या, असे आवाहन मोदींनी देशवासीयांना केले आहे.

मोदींच्या या आवाहनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या व्हिडिओला आवाज देऊन शेअर केला आहे. यात 'किंगखान' शाहरुख खान आणि अभिनेता अक्षय कुमार यांचाही समावेश आहे.

शाहरुख खान अन् अक्षयकुमार यांनी शेअर केलेले व्हिडिओ मोदींनी रिटि्वट केले आहेत. शाहरुखने आपला आवाज देऊन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. शाहरुखच्या या व्हिडिओवर 'सुंदर अभिव्यक्ती' अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे. '

'हे नवीन घर आहे..' अशा शब्दात शाहरुखनं संसद भवनाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अक्षय कुमार याचा व्हिडिओही मोदींनी रिटि्वट केला आहे. त्यावर "खूप चांगले विचार व्यक्त केले," अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे.

संसद भवन उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये मोदींना सेंगोल (Sengol) म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.

या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर काही विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रीय जनता दलाने संसदेच्या या नव्या इमारतीवरुन टि्वट करीत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाने या नवीन संसद भवनाची तुलना शवपेटी (Coffin) सोबत केली आहे. राजदच्या टि्वट हॅडलवरुन दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT