Sheikh Hasina Sarkarnama
देश

Shaikh Hasina Update: माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; बांगलादेशला परत जावे लागणार; काय आहे कारण?

Deepak Kulkarni

New Delhi News : गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश धुमसत आहे.बांगलादेश मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना दिले जाणारे आरक्षण रद्द करावे,या मागणीसाठी आंदोलन पेटले आहे. या आंदोलनाची धग पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचली होती. त्यांना आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन त्यांना देश सोडावा लागला. त्यानंतर त्या भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आल्याने शेख हसीना यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशात (Bangladesh) 17 सदस्यांचे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. पण आता बांगलादेशमधील नव्या सरकारकडून शेख हसीना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता बांगलादेशच्या नव्या अंतरिम सरकारने हसीना यांच्याविरोधात आणखी एक मोठी कारवाई केली आहे.शेख हसीना आणि त्यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेते तसेच खासदारांचे पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने दिली आहे.

माजी पंतप्रधान,सल्लागार,माजी कॅबिनेट मंत्री व खासदारांनी त्यांचे राजनैतिक पासपोर्ट जमा करावे असे आदेश दिले आहेत.त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही डिप्लोमॅटिक पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कुटुंबातील ज्या व्यक्तींकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे, त्यांना तो जमा करणे बंधनकारक असणार आहे.

बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने यांसंबंधीची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे. त्यात डिप्लोमॅटिक पासपोर्ट जमा केल्यानंतर ते सामान्य पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. दोन सुरक्षा यंत्रणांच्या मान्यतेनंतर अर्जदार नागरिकांना सामान्य पासपोर्ट देण्यात येईल असेही गृहमंत्रालयाने कळवले आहे.

बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे.त्याचे प्रमुख प्रो. मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Narendra Modi) फोनवर चर्चा केली होती. मोदींनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.त्यांनी X प्लॅटफॉर्मवर याविषयीची पोस्ट केली होती.

मोदी म्हणाले,अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Mohammad Yunus) यांनी बांगलादेशमधील लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीसाठी भारताच्या पाठिंब्यासाठी साद घातली.यावेळी त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची आणि संरक्षणाची ग्वाही त्यांनी दिल्याचेही मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT